भिवंडीमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या करत तिचे शिर धडावेगळं केलं. ऐवढ्यावर न थांबता आरोपीने बायकोच्या शरीराचे १७ तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या घटनेमुळे भिवंडीत खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाला अटक केली. पोलिस सध्या या तरुणाची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका २५ वर्षीय तरुणाने २२ वर्षीय बायकोची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. बायकोचं शिर धडावेगळं केलं. त्यानंतर तिच्या शरीराचे १७ तुकडे करत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून विल्हेवाट लावली. हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा पोलिसांना एका महिलेचे शिर सापडले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. हा तरुण सतत आपले जबाब बदलत होता. पोलिसांनी खाकी वर्दी दाखवल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबुल केला. पण त्याने आपल्या बायकोची हत्या करण्यामागचं खरं कारण सांगितले नाही. आरोपी आणि त्याची बायको एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत होते आणि आपल्या मुलांना मारहाण करायचे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, ३० ऑगस्ट रोजी ईदगाह रोडजवळील कत्तलखान्याच्या परिसरामध्ये एका महिलेचे डोके आढळले होते. या महिलेचे वय २५ ते २८ वर्षे होते. तिची ओखळ परवीन उर्फ मुस्कान मोहम्मद ताहा अन्सारी अशी झाली. या प्रकरणी पोलिसांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद ताहा आहे. मुस्कान आणि आरोपी दोघेही भिवंडी शहरातील एका कॉलनीमध्ये राहत होते.
आरोपी ट्रक ड्रायव्हर आहे आणि हत्या करण्यात आलेली मुस्कान रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत होती. दोघेही दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर भेटले. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी एकत्र राहत असताना लग्न केले. आरोपीचे आधीच लग्न झाले होते आणि त्याला मुलं होती. त्यामुळे मुस्कानने आरोपीला मुलगा असल्याने वेगळे राहण्याचा आग्रह केला. भिवंडी शहरातील खाडीपासून २० मीटर अंतरावर असलेल्या ईदगाह परिसरात तिने एक खोली भाड्याने घेतली होती आणि दोघेही त्यांच्या एक वर्षाच्या मुलासह राहत होते. या काळात दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागले आणि भांडू लागले आणि स्वतःच्या मुलाला मारहाण करू लागले.
आरोपी आणि मुस्कान यांच्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून नेहमी वाद व्हायचे. याच रागातून मुस्कान २८ ऑगस्टला घर सोडून निघून गेली. त्यानंतर आरोपीने संतप्त होत २९ ऑगस्टला मुस्कानची हत्या केली. हत्यनंतर त्याने तिच्या शरीराचे १७ तुकडे केले आणि ते भरतीच्या वेळी खाडीमध्ये फेकून दिले जेणे करून सर्व पुरावे नष्ट होतील. पण पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला आणि आरोपीचा खरा चेहरा जगासमोर आला. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असून कोर्टाने त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.