ऐन निवडणुकीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची भेट, पाहा नेमके काय घडले?

Sanjay Raut Eknath Shinde Meeting: ऐन निवडणुकीत एकमेकांवर टीकेचे विखारी बाण सोडणारे संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची एका हॉटेलमध्ये भेट झालीय.. मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली..
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut and Maharashtra Deputy CM Eknath Shinde exchange greetings during a surprise meeting at a Mumbai hotel.
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut and Maharashtra Deputy CM Eknath Shinde exchange greetings during a surprise meeting at a Mumbai hotel.Saam Tv
Published On

गद्दार, मिंधे, अमित शाहांचे घरगडी, सकाळचा भोंगा, या शब्दांनी एकमेकांवर टोकाची टीका करणारे.... आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे दोन राजकीय धुरंधर आमने-सामने आले आणि राजकीय चर्चांना उधाण आलं... ही दृश्य पाहा... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांची एका नामांकित हॉटेलमध्ये भेट झाली आणि एकमेकांशी हस्तांदोलनही केलंय..

खरंतर एका कार्यक्रमात संजय राऊतांच्या मुलाखत होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची. ज्यावेळी राऊत मुलाखत संपवून बाहेर निघाले आणि त्याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आणि दोन्ही नेते समोरासमोर आले.. शिंद- राऊतांच्या भेटीत नेमकं काय घडलं...

संजय राऊत आणि शिंदे आमने-सामने आले

शिंदेकडून नमस्कार, नंतर एकमेकांशी हस्तांदोलन

शिंदेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस

तब्येत ठीक आहे...पण वेळ लागेल, असं राऊतांकडून उत्तर

खरंतर राज्याच्या राजकारणाचा स्तर ढासळत चाललाय... राजकीय नेते एकमेकांवर कमरेखालची भाषा वापरुन विखारी टीका करत आहे... हे सगळं सुरु असताना आधी संजय राऊत आजारी असताना एकनाथ शिंदेंनी त्यांची फोनवरून केलेली विचारपूस असो...वा आता समोरासमोर आल्यानंतर हस्तांदोलन करुन एकमेकांची विचारपूस करणं असो... राऊत-शिंदे भेटीमुळे विखारी राजकारणातही एक आशादायी चित्र समोर आलंय.. असंच म्हणांवं लागेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com