Beed Crime: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा, शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार; प्रकरण मिटवण्यासाठी मुंडे-कराडची मध्यस्थी?

Beed Police: बीडमध्ये महिला शिक्षिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बड्या नेत्याने लैंगिक अत्याचार केलयाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Crime: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्यावर गुन्हा, शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी
Beed CrimeSaam Tv
Published On

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने शिक्षक महिलेवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी अजित पवार गटाच्या उपाध्यक्ष नारायण शिंदेविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात फ्लॅट घेऊन देतो म्हणत १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केले आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी मध्यस्थी केल्याचा दावा संबंधितांनी केला आहे. तक्रार दिल्यास आरोपी नारायण शिंदे यांनी महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरात राहणाऱ्या एका शिक्षिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी नारायण शिंदेने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण शिंदे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असून जिल्हा परिषदेचा माजी सदस्य देखील आहे. गंभीर बाब म्हणजे हे प्रकरण मिटवण्यासाठी नारायण शिंदे याने आमदार धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांची मदत घेतली होती. त्यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाल्याचे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

Beed Crime: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्यावर गुन्हा, शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी
Crime: प्रेमसंबंधाला विरोध, बापाने मुलीला संपवलं; आधी कीटकनाशक पाजलं नंतर...

तसेच आरोपी नारायण शिंदे याने या महिलेकडून फ्लॅट घेऊन देतो असे म्हणत तब्बल १ कोटी १० लाख रुपये घेतले असून आता जर तक्रार केली तर तुला जीवे मारून टाकीन. माझी वरपर्यंत पोहोच आहे असे म्हणत धमकी दिल्याचे देखील महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नारायण शिंदे फरार असून त्याचा शोध आता शिवाजीनगर पोलिस घेत आहेत.

Beed Crime: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्यावर गुन्हा, शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी
Pune Crime: पुणे हादरले! ऐन गणेशोत्सवात मुळशी पॅटर्न थरार, तरुणावर कोयत्याने सपासप वार; VIDEO व्हायरल

नारायण शिंदेने महिलेवर अत्याचार करत तिला १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात २३ ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. यानंतर नारायण शिंदे याच्या वतीने वाल्मीक कराडने फोन करत आपण बसून तुमचे प्रकरण मिटवू असे म्हणाले तसेच आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानुसार २५ नोव्हेंबर २०२३ रोजी परळी येथील कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत या महिलेसह आरोपी नारायण शिंदे, धनंजय मुंडे, वाल्मीक कराड अविनाश नाईकवाडे आणि बुधवंत हे उपस्थित होते.

Beed Crime: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्यावर गुन्हा, शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी
Crime News: नशेनं घेतला जीव; दारू पिण्यासाठी मागितले पैसे, बायकोनं नकार देताच डोक्यात घातली हातोडी, नाशिकमध्ये खळबळ

'त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरोपी नारायण शिंदे यांनी केलेल्या फसवणुकीबाबत भरपाई रक्कम म्हणून अडीच कोटी रुपये मला धनंजय मुंडे यांच्यामार्फत देणार होता. परंतु त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरोपी नारायण शिंदे याने पूर्तता केली नाही. मी त्यांना याबाबत विनंती देखील केली परंतु त्या बैठकीस उपस्थित असलेल्या कोणीही काहीही दाद दिली नाही.' असा देखील आरोप या महिलेने केला आहे.

Beed Crime: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्यावर गुन्हा, शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी
Panvel Crime News: मुलीच्या गळ्यावर कोयता, पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला; जामीनावरील आरोपीचा पनवेलमध्ये धुडगूस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com