Crime News: नशेनं घेतला जीव; दारू पिण्यासाठी मागितले पैसे, बायकोनं नकार देताच डोक्यात घातली हातोडी, नाशिकमध्ये खळबळ

Man Kills Wife with Hammer: नाशिकच्या सिन्नर तालुक्यात धक्कादायक घटना घडलीय. दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने पत्नीवर हातोड्याने हल्ला करत तिचा खून केला. या धक्कादायक घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ माजीलय.
Man Kills Wife with Hammer:
Crime NewsSaam tv
Published On
Summary
  • नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात हत्येची घटना घडलीय.

  • दारूसाठी पैसे न दिल्यामुळे महिलेचा खून झालाय.

  • आरोपी पती किरण सानप फरार झाला होता, पोलिसांनी अटक केली.

नशेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा जीव घेतल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. दारूसाठी पैसे न दिल्यानं रागवलेल्या व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या डोक्यात हातोडीचा वार करत तिला जिवे मारलं. ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यात असलेल्या निमगाव सिन्नर येथे संध्याकाळी घडली.

मिळालेल्या महितीनुसार, नंदा किरण सानप (वय 34) असं महिलेचं नाव आहे. घटना घडलेल्याच्या रात्रीपासून पती फरार होता. त्याला मुसळगाव एमआयडीसी पोलिसांनी किरण विष्णू सानप (38) ला नाशिक येथून ताब्यात घेत अटक केली. निमगाव-सिन्नरच्या टेकाडे वस्ती शिवारात किरण विष्णू सानप आणि पत्नी नंदा किरण सानप हे राहत होते. या दोघांमध्ये नेहमीच वाद होत असतात.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास किरण सानपने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याच्या पत्नी पैसे देण्यास नकार दिला त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तो घराबाहेर पडत गावात गेला. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत किरण घरी न आल्याने त्याची आई आणि मुलाने त्याचा गावात शोध घेतला. आई आणि मुलाला पाहताच त्याने आपल्या टेकाडे मळ्यातील वस्तीकडे पळ काढला. दारूच्या नशेत असलेल्या किरण सानपने घरामागे शेतात काम करत असलेल्या पत्नीशी परत वाद घातला.

Man Kills Wife with Hammer:
Shocking News: समोसे आले जिवाशी! पत्नीची इच्छा पूर्ण न करणाऱ्या पतीला सासरच्यांकडून मारहाण | Video Viral

आणि तेथेच असलेली हातोडी हातात घेत तिच्या डोक्यात वार केले. त्यानंतर त्यांचा छोटा मुलगा सार्थक आईला जमखी अवस्थेत पाहिल्यानंतर त्याने आजूबाजूच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने जखमी नंदाला उपचारासाठी सिन्नरला नेले. त्यानंतर तिला नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान नंदाचा मृत्यू झाला.

Man Kills Wife with Hammer:
भीषण! भरधाव डंपरनं गर्भवतीला चिरडलं; अर्भक रस्त्यावर पडलं, महिलेचा दुर्देवी मृत्यू

दरम्यान, नाशिक येथील मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या माहितीनंतर मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्यासह एका टीमने निमगाव सिन्नरला तर दुसऱ्या टीमने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात जाऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान शवविच्छेदनानंतर मयत महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय.

नंदा सानपचे वडील बबन गोपाळा साबळे (66) रा. दापूर, ता. सिन्नर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण सानप याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील करत आहेत.

याबाबत माहिती देताना पोलीस म्हणाले की, पत्नी नंदा हिच्याशी भांडण झाल्यानंतर किरण सानपने तिच्या डोक्यावर हातोडीने हल्ला केला. नंदा रक्तबंबाळ होऊन शेतात पडली होती. तर किरणने हातातील हातोडी फेकून देत तेथून पसार झाला. दरम्यान, मुसळगाव एमआयडीसी पोलिस त्याच्या मागावर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com