Satpura Crime Saam Tv
क्राईम

Crime News: घातपाताचा संशय! मिठात पुरलेला युवकाचा मृतदेह 42 दिवसांनी काढला बाहेर, सातपुड्यातील खळबळजनक घटना

Satpuda Crime News: सातपुड्यातून पुन्हा एक मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईकडे रवाना झाला आहे. या घटनेत तरूणाच्या मृत्यूनंतर ४२ दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला आहे.

Rohini Gudaghe

Youth Killed In Satpuda

घातपाताच्या संशयातून धडगाव तालुक्यातील खडक्या आणि अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या दोन गावातून दोन वेगवेगळ्या युवतींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईला पाठवल्याच्या घटना ताज्या आहेत, असे असतानाच पुन्हा आज अक्कलकुवा तालुक्यातील वेरी येथून एका युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठीच मुंबईकडे रवाना करण्यात (Satpuda Crime News) आला आहे.  (Latest Crime News)

हा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. सापडलेला हा मृतदेह (dead body) मिठात पुरला होता. तो तब्बल 42 दिवसांनी बाहेर काढण्यात आला. त्यामुळे सातपुड्यात पुन्हा खुनाच्या घटनांची गंभीर चर्चा होऊ लागली आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'अशी' घडली घटना

छत्रपती संभाजीनगर येथे उच्च शिक्षण घेणारा धडगाव तालुक्यातील वाहवाणी येथील युवक अनिकेत टेड्या वळवी (वय २३) हा डिसेंबर महिन्यात दिवाळीनिमित्त गावाकडे आला होता. तो २६ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळेस ओळखीच्याच एका इसमासोबत दुचाकीने घराबाहेर गेला. परंतु, तो सकाळपर्यंत परतलाच नव्हता. अखेर ४२ दिवसांनंतर कात्रीच्या केलवाणीपाडा भागात त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

मृतदेहाच्या परिस्थितीवरुन त्याचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनिकेतच्या नातेवाईकांना आला. शिवाय दुचाकी सुस्थितीत होती. सोबत गेलेल्या व्यक्तीला कुठलीच दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे तो घटनेनंतर मयताच्या घरी गेलाच नव्हता, त्यामुळे संशयात भर (Satpdra Crime) पडली.

संशयितांविरोधात गुन्हा नोंद

या संशयापोटी अनिकेतचा मृतदेह (Youth Killed In Satpuda) त्याचं हल्लीचे गाव वेरी ता.अक्कलकुवा येथे मिठात पुरलेला होता. याप्रकरणी केल्ला सिंगा वळवी, खेमसिंग सिंगा वळवी, रघुवीरसिंग सिंगा वळवी, दिवान तेजाला वळवी, नवसा बावा पाडवी व सिंगा बावा पाडवी (सर्व रा.वाहवाणी ता. धडगाव) या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेच्या अधिक चौकशीनिमित शवविच्छेदनासाठी मिठात पुरलेला अनिकेतचा मृतदेह जे. जे.रुग्णालय मुंबई येथे हलविण्यात आला (Crime News) आहे. यावेळी शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, अक्कलकुव्याचे प्रभारी तहसीलदार दिलीप गांगुर्डे, धडगावचे पोलीस निरीक्षक पठाण उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT