Nagpur Crime: नागपुरात रक्तरंजित थरार! गेल्या ४८ तासांत खूनाच्या तीन मोठ्या घटना, परिसरात खळबळ

Seven Killed In Week: नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. मागील आठवड्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा खून झाल्याचं समोर आलं आहे.
Nagpur Crime
Nagpur CrimeSaam Tv
Published On

Nagpur Crime News

नागपूर (Nagpur) जिल्ह्यात खुनाचं सत्र सुरूच आहे. गुन्हेगारीला चांगलंच खतपाणी मिळत असल्याचं दिसतंय. मागील काही दिवसांपासून चोरी, धमकी, खंडणी या घटनांबरोबरच खूनाच्या घटना देखील पाहायला मिळत आहे. शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात काही धक्कादायक घटना घडल्या आहेत, त्याबाबत आपण जाणून घेऊ या. (Latest Crime News)

नागपूर जिल्ह्यात मागील अठ्ठेचाळीस तासांत तीन खुनाच्या घटना घडल्या (Crime News) आहेत, तर आठवड्याभारत सात जणांचा खून झाल्याचं समोर आलं आहे. या घटनांमुळे शहर रक्तरंजित होत असल्याचं दिसून येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

४८ तासांत खूनाच्या तीन घटना

मागील अठ्ठेचाळीस तासांत तीन खनाच्या घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. उधार पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि या घटनेत एकाचा मृत्यू झाला (Killed in Nagpur) आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव नीरज शंकर भोयर ( वय २८ ) असं आहे.

दुसरी खून झाल्याची घटना नंदनवन पोलिसांच्या हद्दीतील कुंभार टोली परिसरात घडल्याचं समोर आलं आहे. वाहतूक दाराकडून चालक गैरहजर राहत असल्याने खून झाल्याची घटना घडली (Nagpur News) आहे. सचिन उईके ( ३० वर्षीय ) असं मृतकाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Nagpur Crime
Nandurbar Crime : धक्कादायक! दुचाकीने बाहेर गेला, पुन्हा घरी परतलाच नाही; ४२ दिवसांनी युवकाचा मृतदेहच सापडला

नागपुरमध्ये रक्तरंजित थरार

तिसरी खून झाल्याची घटना कळमना पोलीस हद्दीत घडली आहे. क्रिकेट खेळत असताना वाद झाला आणि वाद विकोपाला जाऊन खूनाची घटना घडली आहे.  २४ वर्षीय अज्जू इब्राहिम शेख असं मृतकाच नाव आहे. अगदी क्षुल्लक कारणातून ही घटना घडली आहे.

मागील आठवड्यात नागपुरमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला (Nagpur Crime News) आहे. गेल्या ४८ तासांत खूनाच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime
Crime News: पेणमधील लॉज व्यवस्थापकाच्या हत्येचं गुढ उकललं; कोल्हापुरात तरुणाची हत्या,पोलीस मारेकरींच्या शोधात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com