Husband Wife Dispute  Yandex
क्राईम

Sangli News: आंघोळीच्या साबणावरून बायकोने नवऱ्याला धुतलं, पकडीने अंगठाच फोडला; सांगलीतील धक्कादायक प्रकार

Wife Broke Husband Thumb Dispute Over Soap: सांगलीमध्ये नवरा बायकोत आंघोळीच्या साबणावरून वाद झाला. अन् बायकोने नवऱ्याचा अंगठा फोडल्याची घटना घडली आहे.

Rohini Gudaghe

सांगलीमध्ये नवरा बायकोत आंघोळीच्या साबणावरून वाद झाला. अन् बायकोने नवऱ्याचा अंगठा फोडल्याची घटना घडली आहे. बाथरुममध्ये अंघोळीचा साबण कुठे ठेवला? असं बायकोने विचारले असता नवऱ्याने उडवा उडवीचं उत्तर दिलं. याचं रूपांतर हाणामारीत झालं. रागाच्या भरात नवऱ्याने बायकोच्या कानशिलात लगावली. तर संतापलेल्या बायकोने पकडीने थेट नवऱ्याचा अंगठाच (Sangli Crime News) फोडला.

यासंदर्भात नवऱ्याच्या तक्रारीवरून बायकोसह सासरच्या चौघांविरोधात सांगलीच्या संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ मे रोजी ही घटना सांगलीत संजयनगर येथे पाटणे प्लॉटमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये १३ मे रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. नवरा बायकोमधील भांडणं (Husband Wife Dispute) काही नवीन नाहीत. मात्र आता फक्त एक साबण या दोघांमधील भांडणाचं कारण ठरला आहे. आपण नक्की घटना काय आहे ते जाणून घेऊ या.

नक्की काय घडलं?

८ मे रोजी सकाळी बायको अंघोळीसाठी जात होती. त्यावेळी तिला साबण सापडला नाही. तिने नवऱ्याला साबण कुठे आहे, असं विचारलं. यावर तिच्या नवऱ्याने साबण बाथरूममध्ये असेल, असं उत्तर (Sangali News) दिलं. याचा राग येवून बायकोने नवऱ्याला अपशब्द वापरले. तुम्ही मला तुम्ही मला साबण आणून देऊन दमताय का? असा प्रश्न तिने विचारला.

यावरून त्या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. नवऱ्याने बायकोला शिवीगाळ केली. बायकोने नवऱ्याच्या हाताच्या अंगठ्यावप पक्कडने वार केला. यामध्ये नवऱ्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. या भांडणावेळी (Crime News) सासू, सासरे, चुलत सासरे यांनीही तिच्या नवऱ्याला दमदाटी केली. आमच्या मुलीला त्रास देतो, तुला सोडत नाही असं त्यांनी धमकावलं. त्यामुळे या नवऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार सांगलीतून समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

SCROLL FOR NEXT