HC on Alimony To Husband: घटस्फोटानंतर आजारी पतीस पत्नीला द्यावी लागणार पोटगी; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
Mumbai High Court on Alimony
घटस्फोटानंतर ज्याप्रमाणे पत्नी पतीकडे पोटगी मागते त्याचप्रमाणे पतीला देखील पत्नीकडे पोटगी मागण्याचा हक्क आहे, असा निर्णय एका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आजरपण किंवा काही कारणास्तव पती बेरोजगार असेल तर घटस्फोट घेताना तो आपल्या पत्नीकडे पोटगी मागू शकतो. पतीलाही हा कायदेशी हक्क आहे, असं न्यायालयाने म्हटलंय.
मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय देत कल्याणमधील एका घटस्फोटीत पतीला दर महा पत्नीकडून १० हजार रुपयांची पोटगी मंजूर केली आहे. सहदिवाणी न्यायाधीशांनी १३ मार्च २०२० रोजी पत्नीला हा आदेश दिला होता. या निकालाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी पत्नीनं मुंबई उच्च न्यायालयात केलेली आव्हान याचिका फेटाळली आहे.
नेमकं प्रकरण काय?
संसारात मतभेद झाल्याने झाल्याने पतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने कल्याण न्यायालयात धाव घेतली. घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर पत्नीने पोटगीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी पतीने देखील पत्नीकडून पोटगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर पतीचा आजारी आणि बेरोजगार असल्याने त्याचा अर्ज स्विकारण्यात आला.
कल्याण न्यायालयाने यावर निर्णय देताना म्हटले की, पती आजारी आहे, तसेच तो बेरोजगार देखील आहे. त्यामुळे त्याच्या उदनिर्वाहासाठी पत्नीने पतीला पोटगी द्यावी. अंतरीम पोटगी १० हजार रुपये दर महा ठरवण्यात आली आहे. पतीच्या बाजून लागलेल्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

