Sambhajinagar Deputy Collector bribery, anti-corruption raid : छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकारी लाज घेताना जाळ्यात अडकलाय. अँटी करप्शन टीमने संभाजीनगरमधील उप जिल्हाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकत भंडाफोड केला. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद गोंडुराव खिरोळकर याला लाच घेताना पकडल्यानंतर अँटी करप्शन टीमने घराची झडती घेतली. घरझडतीमध्ये मोठं घबाड सापडलं. रोख रक्कम-13,06,380 रूपये, सोन्याचे आणि चांदीचे दागिने सापडले आहेत. खिरोळकर याच्या घरात मौल्यवान वस्तू व रोख रक्कम अशी एकूण किंमत ६७ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल मिळाला.
वर्ग-२ ची जमीन वर्ग- १ करण्यासाठी ४१ लाखांची लाच घेणाऱ्या छत्रपती संभाजी नगरच्या निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर आणि त्याच्या दिलीप त्रिभुवन महसूल सहायकाला काल सायंकाळी अँटीकरप्शन पथकाने अटक केली. खिरोळकरला अटक करताच दुसर्या पथकाने त्याच्या घरात प्रवेश करत झाडाझडती घेतली. त्यात १३ लाख ६ हजार रुपये रोख, ५८.९ तोळे सोन्याचे दागिने व ३ किलो ५५३ ग्रॅम चांदीचे दागिन्यांचे घबाड सापडले. तर त्रिभुवनच्या घराची झाडाझडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
संभाजीनगर तालुक्यातील तिसगाव येथे ६ हजार १६ गुंठे वर्ग-२ मधील जमीन एका व्यक्तीने नियमानुसार घेतली. रजिस्ट्री खरेदीखतही करून घेतले. वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ मध्ये करण्यासाठी पैसे भरावे लागतात. या प्रक्रियेसाठी खिरोडकर आणि त्रिभुवन यांनी यापूर्वी २३ लाख रुपये घेतले. पुन्हा चलन देण्यासाठी १८ लाख रुपयांची मागणी केली. त्यातील ५ लाख रुपये मंगळवारी देण्याचे ठरले. उर्वरित १३ लाख रुपये काम पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. २६ मे रोजी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशासुद्धा केली. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिभुवन याला ५ लाख रुपये घेताना पकडण्यात आले. लगेच खिरोडकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्रिभुवन याच्याकडून लाचेची रक्कम, मोबाइल, तीन हजार रुपये जप्त केले. खिरोडकर याच्याकडून मोबाइल आणि कॅबिनमधून ७५ हजार रुपये जप्त केले. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.