ED, Delhi Special-26 Saam Digital
क्राईम

ED, Delhi Special-26: दिल्लीत 'स्पेशल -२६', ईडी अधिकारी बनून आले अन् कोट्यवधी रुपये लुटून नेले

3.20 Crore Robbery: बाबा हरिदासनगर भागात कारमधून आलेल्या काही ठगांनी ईडीचे अधिकारी असल्याचं सांगून एकाच्या घरावर धाड टाकली आणि ३.२० कोटी रुपयांची रोकड लुटून नेली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ED, Delhi Special-26

दिल्लीत काही ठगांनी 'स्पेशल -२६' चित्रपटासारखी धाड टाकली आणि पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. या चित्रपटात अक्षय कुमार आणि अनुपम खेर सीबीआय आणि आयटी अधिकारी बनून धाड टाकत होते, त्याच पद्धतीने दिल्लीच्या बाबा हरिदासनगर भागात कारमधून आलेल्या काही ठगांनी ईडीचे अधिकारी असल्याचं सांगून एकाच्या घरावर धाड टाकली आणि ३.२० कोटी रुपयांची रोकड लुटून नेली.

त्या कुटुंबाला अधिकारी तोतया असल्याचं समजल्यानंतर त्यांनी त्वरित पोलिसांना फोन करून याबाबत कळवलं. त्यांनतर पोलिसांनी भागातील सर्व ठिकाणच्या पोलिसांना याची माहिती दिली. मिळालेल्या सूचनेनुसार सीपीआर पोलिसांच्या व्हॅनने त्या लुटारुंच्या कारला नरेला इथे थांबवलं आणि ७० लाख रुपये जप्त केले. पोलीस पण अवाक झाले आहेत की, या काळात पण नटवरलाल सारखी लूटमार करण्याची हिंमत या चोरट्यांमध्ये कुठून आली असेल.

ज्या घरावर हा दरोडा पडला. त्या घराचा मालक एका खासगी बँकेत काम करतो. नुकताच त्याने गालिबपूर गावातील त्याची अडीच एकर जमीन ४.७० कोटी रुपयांना विकली होती. त्या जमिनीची ३.२० कोटी रोकड आणि काही चेक मिळाले होते. आश्चर्य म्हणजे त्या व्यक्तीने ही सर्व रक्कम घरीच ठेवली होती.

दरम्यान, घरमालक शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास जेवणासाठी घरी आला होता. त्यावेळी अचानक एका कारमधून ५ ते ६ जण घरी आले. त्यांनी ईडीचे अधिकारी असल्याचं सांगितल्यामुळे त्यांना बसायला सांगितलं. थोड्यावेळाने त्यांनी त्या व्यक्तीला कारमध्ये बसवून मित्राऊ आणि सुरखपूर भागात २ तास फिरवलं. त्यांनतर धमकी देऊन पुन्हा घरी घेऊन आले. घरी आल्यांनतर त्यांनी त्याच्याकडे अनधिकृत रक्कम असल्याची रट लावली. शेवटी घरी ठेवलेली ही रक्कम जप्त केली. त्याला कारमध्ये बसवलं. त्याचा आणि त्याच्या आईचा मोबाईल घेऊन फरार झाले. जाताना त्याला मित्राऊ गावानजीक पेट्रोल पंपावर कारमधून फेकून दिलं.

ज्यावेळी त्या व्यक्तीला कारमधून फेकून दिलं त्यावेळी त्याने त्वरित पोलिसांना फोन करून याबाबत कळवलं. त्या व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी कारला नरेला येथे अडवलं आणि चौकशी केली. त्यांचं वर्तन संशयास्पद आढळल्यामुळे कारची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना ७० लाखांची रोकड सापडली.पोलिसांनी ही रोकड जप्त केली असून चालकासह ४ दरोडेखोरांना ताब्यात घेतल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT