Wardha Crime News: पैशांसाठी पती झाला हैवान; पत्नीचं डोकं जमिनीवर आपटून हत्या, धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ

Crime News: पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केलीये. पोलीस या प्रकरणी अधिक तापस करत आहेत.
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam TV

Wardha News:

रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. आपल्या रागावर नियंत्रण नसल्यास अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींना गमावून बसतात. वर्धा येथून अशीच एक घटना समोर आली आहे. पतीने रागाच्याभरात आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केलीये. पोलीस या प्रकरणी अधिक तापस करत आहेत. (Latest Marathi News)

Wardha Crime News
Yavatmal Crime : विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा निघाला सराईत गुन्हेगार, पोलीस काय म्हणाले?

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुलगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीये. मंगला राजेश राजगत्ता (४५ रा. दखनी फैल, पुलगाव) असं मृत महिलेचं नाव आहे. तर राजेशसिंग राजदत्ता (५५) असं आरोपी पतीच नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

हत्येमागचं कारण काय?

पती आणि पत्नीमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. काल मजुरीच्या पैशांच्या कारणातून त्यांच्यात परत एकदा वाद झाला. त्यानंतर संतप्त पतीने पत्नीचं डोकं जमिनीवर ठेचून तिची हत्या केली.

पत्नीने पैसे न दिल्याने पतीचा संताप फार वाढला होता. रागाच्या भरात तो पत्नीचं डोकं जमिनीवर आपटत राहिला. यातच महिलेचा मृत्यू झालाय. राहुल रामदास चांनपुरकर (४३) याने पुलगाव पोलिसांत घटनेबाबत तक्रार दाखल केली होती.

पुलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी घटनेची दखल घेतलीये. पोलिसांनी आरोपी राजेशसिंग दखनी फैल परिसरातून अटक करत बेड्या ठोकल्यात. या प्रकरणी पोलीस गावात चौकशी करून तपास करत आहेत.

Wardha Crime News
Washim Crime News: वाशिममध्ये एकाच आठवड्यात तीन तरुणांची हत्या; धक्कादायक घटनांनी परिसरात भीतीचं वातावरण

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com