Rajasthan Crime Saam Tv
क्राईम

Shocking: हे बाळ आमच्या मुलाचं नाही..., सासू-सासऱ्यांकडून चारित्र्यावर संशय; सुनेने ९ महिन्यांच्या मुलीला संपवलं

Rajasthan Crime: राजस्थानमध्ये एका महिलेने आपल्या पोटच्या ९ महिन्यांच्या मुलीची हत्या केली. सासू-सासरे चारित्र्यावर संशय घेत हे बाळ आमच्या मुलाचे नाही असे म्हणत होते. या त्रासाला कंटाळून तिने हे कृत्य केले.

Priya More

Summary -

  • राजस्थानमध्ये आईने ९ महिन्यांच्या मुलीची हत्या केली

  • सासू-सासरे चारित्र्यावर संशय घेत असल्याने केले भयंकर कृत्य

  • पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली

  • हे बाळा आमच्या मुलाचं नावही असे सासू-सासरे महिलेला बोलायचे.

राजस्थानमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका महिलेने आपल्या ९ महिन्यांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. ही घटना राजस्थानच्या खैरथल- तिजरा जिल्ह्यातील किशनगढ बास या ठिकाणी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. या महिलेची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने धक्कादायक खुलासा केला. सासरच्या मंडळींकडून सतत चारित्र्यावर संशय व्यक्त केला जात होता. या त्रासाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उलचलले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १६ नोव्हेंबर रोजी खैरथल तिजारा जिल्हातील किशनगढ बास या गावामध्ये घडली. ९ महिन्यांच्या मुलीची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. जफरउद्दीन नावाच्या एका व्यक्तीने किशनगढ बास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये त्याने रुनिजा नावाच्या महिलेवर ९ महिन्यांच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप केला. या मुलीचा मृतदेह घरातील खाटेवर आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

पोलिसांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तर बाळाचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी हत्या करण्यात आलेल्या बाळाच्या आईचा शोध घेत तिला अटक केली. पोलिसांनी आरोपी महिलेची कसून चौकशी केली. तिने पोलिसांना सांगितले की, सासू, सासरे आणि घरातील इतर लोक तिला टोमणे मारत होते आणि ते चारित्र्यावर संशय घेत होते. त्यांना मुलगा हवा होता पण मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर ते म्हणायचे की हे बाळ आमचं नाही तर दुसऱ्याचे आहे.

सासू-सासरे महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत होते. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमी भांडण व्हायचे. सततच्या याच त्रासाला कंटाळून संतप्त झालेल्या महिलेने शेवटी आपल्या ९ महिन्यांच्या निष्पाप मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर ती घरातून फरार झाली. पोलिसांनी या महिलेचा शोध घेत तिला अटक केली. या महिलेने पोलिसांना असे देखील सांगितले की, माझ्या सासरची लोकं हुंडा मागत होते. हुंड्यात गाडी मागत होते. त्यासाठी ते मला खूप त्रास द्यायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parineeti Chopra Baby Name : परिणीती चोप्रा अन् राघव चड्ढाच्या लेकाचं बारसं, नावाचा अर्थ सांगत शेअर केला फोटो

Leopard Attack : शेतात दबा धरून बसला, संधी साधून बिबट्याने दुचाकीवरून जाणाऱ्या नवरा बायकोवर झडप घातली

Prajakta Mali: योग साधनाद्वारे प्राजक्ता माळीने सांगितला तिच्या तंदुरुस्तीचा मंत्र|VIDEO

घरात बिबट्या शिरल्याचा थरार; विद्यार्थ्याने चप्पल फेकून केली खात्री|VIDEO

Maharashtra Live News Update: बदलापुरात शिवसेना शिंदे गटाचा काँग्रेसला दणका

SCROLL FOR NEXT