Rajasthan Crime  Saam Tv
क्राईम

Crime News: आधी वकील गर्लफ्रेंडवर गोळ्या झाडल्या, नंतर स्वत:लाही संपवलं; फॉरेस्ट ऑफिसजवळ गोळीबाराचा थरार

Rajasthan Crime: राजस्थानमध्ये भयंकर घटना घडली. एका विवाहित तरुणाने गर्लफ्रेंडवर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वत:वर देखील गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

राजस्थानच्या कोटामध्ये एका तरुणाने आपल्या वकील गर्लफ्रेंडवर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वत:वर देखील गोळी झाडून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री कोटाच्या आरके पुरम परिसरात घडली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची गर्लफ्रेंड गंभीर जखमी झाली. या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर कोटा मेडिकल कॉलेजच्या नवीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गर्लफ्रेंडवर गोळ्या झाडणाऱ्या तरुणाचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, करपण गुर्जर (३२ वर्षे) असं तरुणाचे नाव असून पूर्वा शर्मा (२९ वर्षे) असं तरुणीचे नाव आहे. करणने ज्या पिस्तूलने पूर्वावर गोळी झाडली त्याच पिस्तुलने त्याने स्वतःवर देखील गोळी झाडली. घटनास्थळावरून पोलिसांनी पिस्तूल जप्त केली. ही पिस्तूल बेकायदेशीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. करणला पिस्तूल कुठून मिळाली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

डीएसपी मनीष शर्मा यांनी सांगितले की, गोळी लागलेल्या तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तरुणीने पोलिसांना सांगितले की, दोघांमध्ये दोन-तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. तरुणाचे वडील इतिहासलेखक आहेत. या तरुणाविरोधात आधी तीन-चार गुन्हे देखील दाखल आहेत.

११ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता आरके पुरम येथील मुकंदरा वन विभागाच्या कार्यालयाजवळ ही गोळीबाराची घटना घडली. करण आणि पूर्वामध्ये तो विवाहित होता यावरून वाद झाला होता. घटस्फोटाची चर्चा सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला यावेळी करणने स्कूटर थांबवली आणि पूर्वाच्या डोक्यावर मागून गोळी झाडली. ती रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली. पूर्वाचा मृत्यू झाल्याचे समजून करणने स्वत:वर देखील गोळी झाडली. या घटनेत करणचा जागीच मृत्यू झाला. तर पूर्वा गंभीर जखमी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

SCROLL FOR NEXT