Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

parbhani News : अंतरमशागत करत असताना त्यांना विद्युत तार दिसली नाही. यामुळे त्याच तारेला त्यांचा औत चा धक्का लागल्याने जोरदार विजेचा झटका बसला. यामध्ये गोपाळराव घांडगे यांचा मृत्यू झाला
parbhani News
parbhani NewsSaam tv
Published On

विकास शिंदे 
परभणी
: पावसाने उघडीप दिल्याने सध्या शेतातील आंतर मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी कोळपणी, वखरणी करत आहेत. अशाच प्रकारे कापसाची लागवड केलेल्या शेतात पीक कोळपणीचे काम करत असताना दुर्दैवी घटना घडली आहे. शेतातून गेलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्यासह दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. 

परभणीच्या पाथरगव्हाण बुद्रुक येथील शेतशिवारात सदरची घटना घडली आहे. या घटनेत गोपाळराव घांडगे (वय ४०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्ग शेतातील कामे करण्यासाठी लागला आहे. पिकांमध्ये उगविलेले गवत काढण्यासाठी कोळपणी करण्यासोबत निंदणीचे कामे करत आहे. त्यानुसार घांडगे हे देखील शेतात कामासाठी गेले होते. 

parbhani News
Panvel Corporation : शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावणे भोवले; मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षणाधिकाऱ्यास बजावली नोटीस

विजेचा जोरदार झटक्यात जागीच मृत्यू 

शेतात मशागीतचे काम करत असताना लोखंडी औत घेऊन कपाशी पिकात कोळपणी करण्याचे काम शेतकरी घांडगे हे भावासोबत काम करत होते. यात शेताच्या बांधावर असलेल्या विद्युत पोलाच्या ताराला लोखंडी औताचा स्पर्श झाला. यामुळे जोरदार झटका बसला. अंतरमशागत करत असताना त्यांना विद्युत तार दिसली नाही. यामुळे त्याच तारेला त्यांचा औत चा धक्का लागल्याने जोरदार विजेचा झटका बसला. यामध्ये गोपाळराव घांडगे यांचा मृत्यू झाला. 

parbhani News
Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

भाऊ थोडक्यात बचावला 

तसेच औताला जुंपलेले दोन्ही बैलांचा देखील मृत्यू झाला आहे. तर गोपाळराव घांडगे यांचा भाऊ यांना देखील विद्युत तारेच्या धक्का लागला. यात ते दूरवर फेकले गेल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान गोपाळराव घांडगे त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com