Panvel Corporation
Panvel CorporationSaam tv

Panvel Corporation : शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावणे भोवले; मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षणाधिकाऱ्यास बजावली नोटीस

Panvel News : शाळेमध्ये अक्षयपात्र संस्थेला सदरील कामे करण्यासाठी ठेका देण्यात आला असून या संस्थेमार्फत कामांसाठी अर्थात भांडी धुण्यासाठी शाळेत आया आहेत. तरी देखील मुलांना सदरील काम लावण्यात आले
Published on

विकास मिरगणे 
पनवेल
: पनवेल महानगरपालिका अंतर्गत असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवावयास लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र विद्यार्थ्यांना ताट धुवावयास लावणे ही बाब अत्यंत गंभीर व चुकीची असल्याने याची तातडीने दखल घेवून पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच शिक्षण अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पनवेल महानगरपालिका अंतर्गत असलेल्या श्री गणेश विद्या मंदिर शाळा क्र. ६ मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. शाळेमध्ये सदरील कामे करण्यासाठी अक्षयपात्र या संस्थेची निवड शाळा व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात आली आहे. अर्थात भांडी धुण्यासाठी शाळेत आया आहेत. असे असताना देखील मुलांना ताट आणि डब्बा धुवायला लावण्यात आल्याचे समोर आले आहे. 

Panvel Corporation
Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

महापालिकेकडून तात्काळ दखल 

दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेने याची तात्काळ दखल घेतली आहे. सदरील कामे करणाऱ्या आया यांना बदलावे असे स्पष्ट आदेश सबंधित संस्थेला या प्रकरणी देण्यात आले आहेत. तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन सुदाम हिलम यांच्यावर या प्रकरणी निष्काळजीपणा केल्यामुळे तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तसेच पनवेल महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

Panvel Corporation
Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

सर्व मनपा शाळांना दिले पत्र 
सदरचा प्रकार समोर आल्यानंतर पनवेल महानगरपालिका अंतर्गत असलेल्या सर्व शाळांना आयुक्तांनी पत्र दिले आहे. यात अशा प्रकारच्या बाबींसंदर्भात कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा चालणार नाही. सर्व संबंधितांनी अत्यंत जागरूकतेने लहान मुलांच्या बाबतीत सतर्क असावे अशा ही सुचना सर्व शाळांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com