पिंपरी चिंचवड : उत्तर प्रदेशातील बलरामपूर मध्ये झांगुर बाबाच्या नावाने जलालुद्दीन प्रसिद्ध होता. त्याठिकाणी कोठी तयार करून अवैध धंदे सुरू केले होते. इतकेच नाही तर जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान धर्मांतरण करून अनेकांची फसवणूक करत करोडोची माया जमविणाऱ्या या छांगुर बाबाचे आता पुणे कनेक्शन समोर आले आहे.
उत्तर प्रदेश एटीएसने या छांगुर बाबाला सदर प्रकरणात बलरामपूर येथून अटक करण्यात आले आहे. त्यानंतर अवैध धर्मांतराच्या नेटवर्कचा पर्दाफाश झाला. छांगुर बाबा गरीब आणि असहाय लोकांना पैशाचे प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मांतर करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या छांगुर बाबाने पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात तब्बल १६ कोटी रुपये किंमत असलेली जमीन खरेदी करण्यासाठी पुण्यात आला असल्याचे देखील आता समोर आले आहे.
जमीन खरेदी व्यवहारात पुण्यात फसवणूक
लोणावळ्यात खरेदीसाठी दस्त नोंद देखील त्याने केली होती. मात्र या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात त्याने मोहम्मद खान नामक व्यक्तीला फसविल्याची माहिती आता समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या मोहम्मद खान हा आरोपी छांगुर बाबाचा पुण्यातील हस्तक आणि त्याचा अकाउंटन्ट म्हणून ओळखला जातो.
पुणे कनेक्शनमध्ये नाट्यमय वळण
दरम्यान आता या छांगुर बाबाच्या पुणे कनेक्शनमध्ये आणखी एक नाट्यमय वळण समोर आले आहे. ते म्हणजे याच मोहम्मद खान ने बाबाचे काळे कारनामे उघड करत त्याच्या टोळीत इतर अनेक जण असून त्यांचे काळे कारनामे उघडं केले आहेत. आता या बाबाच्या प्रकरणात पुणे पोलिसांकडून काय कारवाई करण्यात येते; हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.