Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana July Installment: लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता रक्षाबंधन सणापूर्वी टाकण्यात येणार आहे. या निर्णयाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्टी केलीय.
Ladki Bahin Yojana update
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary
  • लाडकी बहीण योजनेचा ₹१५०० चा जुलै हप्ता ९ ऑगस्ट २०२५ पूर्वी जमा होणार

  • रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बहिणींना मिळणार आर्थिक गिफ्ट

  • डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली

  • हप्ता थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जाणार

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीची सण. या सणाच्या मुहूर्तावर सरकार लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता देणार आहे. रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता राज्य सरकार जुलै २०२५ महिन्याचा ₹१५०० रुपयांचा हप्ता दिनांक ९ ऑगस्ट २०२५ पूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतची माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलीय.

राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ₹१५०० मासिक मदत जमा केली जाते. मात्र जुलै महिन्याचा हप्ता खात्यात आला नसल्याने महिलांमध्ये नाराजी होती. परंतु सरकारनं आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचे गिफ्ट देत त्यांची नाराजी दूर केलीय. यासाठी शासनाने एकूण ₹७४६ कोटींचा निधी वितरित केला आहे. योजनेच्या निधी वितरणासाठी बीम्स प्रणालीचा वापर करण्यात आलाय.

दरम्यान या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळते. याशिवाय त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झालीय. रक्षाबंधनला हप्ता देण्याचा निर्णय घेतल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारचे मनःपूर्वक आभार मानलेत शिवाय निर्णयाचे स्वागत देखील केले आहे. हा निर्णय केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर तो महिलांच्या सशक्तीकरणाचा एक प्रेरणादायी टप्पा आहे. तो मानवी मूल्यांशी जोडलेला आणि सामाजिक समतेची जाणीव असलेला आहे,असं त्यावेळी म्हणाल्या.

Ladki Bahin Yojana update
Car insurance: वादळी पावसात कारवर झाड पडले तर विमा मिळतो का?

यासह त्यांनी लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या सुविधांविषयी माहिती दिली. आम्ही आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्यातून खातेदार महिलांना कर्ज, व्यवसाय आणि बाजारपेठेची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. महिलांचे बचत गट, स्वयंरोजगार आणि उत्पादन विक्री यांना चालना देण्याच्या दिशेने हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितलं.

Ladki Bahin Yojana update
Central Govt Scheme: पहिल्या बाळाच्या जन्मावर ५०००, दुसऱ्यावेळी मुलगी झाली तर मिळतील ६ हजार रुपये; काय आहे सरकारची योजना?

याचबरोबर नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना शेलक्या शब्दात सुनावलं. लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे, पण काही राजकीय टीकाकारांकडून "ही योजना बंद होणार" असा चुकीचा प्रचार केला जातोय. मात्र प्रत्यक्षात लाभार्थी महिलांचा या योजनेवर ठाम विश्वास आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर योजनेचा लाभ घेतलाय. त्यांच्यात आत्मविश्वास आणि आर्थिक सक्षमता वाढली आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com