Rajasthan Crime Saam Tv
क्राईम

Crime: अनैतिक संबंधात अडथळा, गर्लफ्रेंडसाठी भाजप नेत्याकडून बायकोची हत्या, धारदार शस्त्राने वार करत संपवलं

Rajasthan Crime: भाजप नेत्याने अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या बायकोची निर्घृण हत्या केली. गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरूनच त्याने बायकोला संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

Priya More

भाजपच्या नेत्याने बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अजमेरमध्ये ही घटनाघडली. अनैतिक संबंधामध्ये बायको अडथळा ठरत असल्यामुळे भाजप नेत्याने हे धक्कादायक कृत्य केले. बायकोची हत्या करून भाजप नेत्याने घरामध्ये दरोडा पडल्याचा बनाव रचत तिच्या मृतदेहाशेजारी रडत बसला. या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी सुरूवातीला दरोडा पडल्याच्या अँगलने तपास सुरू केला शेवटची खरं सत्य समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी भाजप नेत्यासह त्याच्या गर्लफ्रेंडला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या अजमेरमध्ये ही खळबळजनक घटना घडली. रोहित सैनी असं आरोपी भाजप नेत्याचे नाव आहे. तर संजू सैनी असं हत्या करण्यात आलेल्या भाजप नेत्याच्या बायकोचे नाव आहे. रोहितने आपल्या गर्लफ्रेंडसाठी बायकोला संपवलं. पोलिसांनी भाजप नेता आणि त्याची गर्लफ्रेंड रितूची कसून चौकशी केली असता दोघांनी गुन्हा कबुल केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्ही दाखल करत त्यांना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, भाजप नेता रोहित सैनीनी त्याची गर्लफ्रेंड रितूच्या सांगण्यावरून बायको संजूची निर्घृण हत्या केली. रोहितने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात दरोडा पडल्याचा बनाव रचला. दरोडेखोरांनी घरात घुसून त्यांनी दागिने लंपास करत संजूची हत्या केल्याचे त्याने सांगितले. पण या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना रोहितवर संशय आला. त्यांनी त्याची चौकशी केली तर तो सतत आपला जबाब बदलत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाकीचा धाक दाखवताच त्याने बायकोच्या हत्येची कबुली दिली. गर्लफ्रेंड रितूच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले. रितूच्या संजूला संपवण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला होता. या दबावातूनच त्याने संजूची हत्या केली.

त्याने धारधार शस्त्राने वार करत संजूची हत्या केली. संजूची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाशेजारी तो रडत बसला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला रोहितला अटक केली. त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड रितूला अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींची पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे सध्या राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rule Change: आजपासून UPI मध्ये मोठा बदल! जाणून घ्या नवीन सुविधा आणि नियम

Maharashtra Live News Update: बीड जिल्ह्यात धुवाधार पावसामुळे सीना नदीला पूर

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; २५ वर्षीय अभिनेत्रीवर सिनेमात काम देण्याचं आमिष देऊन ३ वर्ष अत्याचार केल्याचा आरोप

Nandurbar : बनावट कागदपत्रांचा आधारे मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती; नंदुरबार शिक्षण विभागाचा बोगस कारभार

Navratri 2025: नवरात्रीमध्ये घरी आणा या गोष्टी, माता लक्ष्मीच्या कृपेने होईल लाभ

SCROLL FOR NEXT