Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Rajasthan Crime News : एका ५५ वर्षीय व्यक्तीने आपल्या सूनेवर वाईट नजर ठेवत तिला आपल्या वासनेचा शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सूनेने नवऱ्याला माहिती त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
Rajasthan Crime News
Rajasthan Crime NewsSaamtv
Published On
Summary

एकट्या सूनेला पाहून नराधम सासऱ्यानं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

हे प्रकरण रामगंज मंडी शहरातील आहे.

आरोपी सासरा हा निवृत्त सैनिक आहे.

राजस्थानमधील कोटामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका व्यक्तीनं आपल्या सुनेवरच वाईट नजर ठेवत तिला आपल्या वासनेचा शिकार करण्याचा प्रयत्न केला. घरात एकट्या सूनेला पाहून नराधम सासऱ्यानं तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सासऱ्याला धक्का मारून तिने तेथून पळ काढला नंतर फोन करून नवऱ्याला सर्व प्रकार सांगितला.

हे धक्कादायक प्रकरण रामगंज मंडी शहरातील आहे.आरोपी हा निवृत्त सैनिक आहे. पीडित सूनेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा नवरा जयपूरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. तर ती रामगंज मंडीमध्ये सासरच्या घरी राहते. तिची सासू खैराबाद समितीची प्रमुख आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा घराबाहेर असते. आरोपी सासरा हा निवृत्त सैनिक असून त्याचे वय ५५ वर्ष आहे.

Rajasthan Crime News
Pune Crime: पैशांची मागणी, वारंवार शिवीगाळ; तरुणीचं डोकं फिरलं, रॉडने मारहाण करत तरुणाला संपवलं

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिला तिचा सासरा नेहमी त्रास देत असायचा. तो तिच्यासोबत घाणेरडं कृत्य करायचा. पीडिता सून जेव्हा जेव्हा बाथरूममध्ये जायची तेव्हा सासरा डोकावून बघत असायचा. सुरुवातीला सूनेने सासऱ्याच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. पण एकेदिवशी नराधम सासऱ्यानं साऱ्या मर्यांदा ओलांडल्या. सून बाथरूमधून आल्यानंतर सासऱ्यावर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

Rajasthan Crime News
Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सून घरात एकटीच होती. तेव्हा नराधम सासऱ्यानं तिला मागून पकडलं नंतर तिला बेडरुमवर ढकललं त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने सासऱ्याला धक्का मारत तेथून पळाली. त्यानंतर नवऱ्याला फोन करून सासऱ्याचं कृत्य सांगितलं. नवऱ्यानं बायकोची आपबीती ऐकल्यानंतर पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्हा दाखल केला.

तक्रार दाखल करूनही आरोपींना अटक करण्यात विलंब होत असल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय. घटनेनंतर पीडिता तिच्या माहेरी परतली. आणि तिथून न्याय मागत राहिली. गेल्या आठवड्यात कुटुंबाने एसडीएमना एक निवेदन सादर करून आरोपीच्या अटकेची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com