Crime News : धक्कादायक! मुतखड्याचं ऑपरेशन, डॉक्टरांनी तरूण शेतकऱ्याची किडनीच गायब केली

Kidney Theft in UP Hospital : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली. मुतखड्यावरील उपचाराच्या नावानं डॉक्टरांनी शेतकऱ्याची किडनीच चोरी केली. पोलिसांनी बोगस डॉक्टरांचा शोध सुरू केला आहे.
मुतखड्यावर शस्त्रक्रिया केली, डॉक्टरांनी किडनी चोरली, उत्तर प्रदेशातील धक्कादायक प्रकार
kidney Racketsaam tv
Published On
Summary
  • उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार

  • मुतखड्याच्या ऑपरेशनच्या नावाखाली शेतकऱ्याची किडनी चोरली

  • किडनी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश

  • बोगस डॉक्टरांचा शोध सुरू

उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुतखड्यावरील उपचाराच्या नावानं डॉक्टरांनी एका हतबल शेतकऱ्याची किडनीच चोरी केली. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोटवा बाजार येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. मुतखड्यावरील उपचारासाठी गेलेल्या शेतकऱ्याची किडनीच डॉक्टरांनी काढली. शेतकऱ्याची प्रकृती खालावल्यानंतर त्यानं वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी आपली किडनीच गायब असल्याचा प्रकार उघड झाला. किडनी गायब झाल्यानं माहीत होताच शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली.

अलाउद्दीन हा ३५ वर्षीय तरूण शेतकरी कुशीनगरच्या नेबुआ नौंरगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर खुर्द गावात राहतो. त्याला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रचंड वेदना होत असल्यानं त्यानं वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. त्याला मुतखड्याचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळंच त्याचं पोट दुखत होतं. १४ एप्रिल २०२५ रोजी तो कोटवा बाजारमधील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला. या हॉस्पिटलचा संचालक इमामुद्दीन आणि तार मोहम्मद यांना त्यांनी होणारा त्रास सांगितला.

मुतखडा असून, तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल, असं हॉस्पिटलच्या संचालकांनी सांगितलं. त्यानंतर रात्रीच कोणताही सर्जन नसताना याच बोगस डॉक्टरांनी स्वतःच त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. सुरुवातीला केवळ मुतखड्यावरीलच शस्त्रक्रिया झाली आहे असा समज शेतकऱ्याचा झाला. पण शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी त्याची प्रकृती खालावत गेली. त्यानंतर तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला आणि आपल्याला होणारा त्रास सांगितला.

मुतखड्यावर शस्त्रक्रिया केली, डॉक्टरांनी किडनी चोरली, उत्तर प्रदेशातील धक्कादायक प्रकार
Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

बरेच दिवस औषधं घेऊनही अलाउद्दीनच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. दुसऱ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचं त्यानं ठरवलं. त्यानं तात्काळ दुसऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्या डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर अल्ट्रासाउंड करून घेतलं. त्याचे रिपोर्ट आल्यानंतर सगळ्यांनाच हादरा बसला. रिपोर्टमध्ये डावी किडनीच नसल्याचं स्पष्ट झालं. हे समजल्यानंतर अलाउद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

अलाउद्दीननं किडनी गायब करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी आदेश काढले. त्यानुसार, हॉस्पिटलमधील बोगस डॉक्टर इमामुद्दीन आणि तार मोहम्मद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. तर दोन्ही आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुतखड्यावर शस्त्रक्रिया केली, डॉक्टरांनी किडनी चोरली, उत्तर प्रदेशातील धक्कादायक प्रकार
Kabutarkhana : कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; सुप्रीम कोर्टाचे आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com