Crime News  Saam Tv News
क्राईम

Shocking Crime : एकाचवेळी २ तरुणींनी बोलावलं, हॉटेलमध्ये पोहोचताच धक्कादायक प्रकार; तरुण ३ दिवस मानसिक धक्क्यात

Crime News : पैशाच्या लोभापायी नातेसंबंध आणि विश्वास चिरडून टाकण्याची घटना राजस्थानातील बारमेर येथून समोर आली आहे. या घटनेची माहिती ज्याला मिळाली त्यांना धक्काच बसला.

Prashant Patil

बारमेर : पैशाच्या लोभापायी नातेसंबंध आणि विश्वास चिरडून टाकण्याची घटना राजस्थानातील बारमेर येथून समोर आली आहे. या घटनेची माहिती ज्याला मिळाली त्यांना धक्काच बसला. येथे एका मुलीच्या वडिलांनी आणि चुलत भावानं तिच्या ओळखीच्या एका तरुणाला तिच्या नंबरवरून मेसेज पाठवून फसवलं. त्यानंतर त्यांनी त्याला ओलीस ठेवलं आणि तीन दिवस त्याचा छळ केला.

ही घटना बाडमेरच्या शिवनगर भागातील आहे. पोलिसांनी कट रचणाऱ्या काका-पुतण्या या दोघांना अटक केली आहे, तर दुसरा आरोपी अजूनही फरार आहे. खरंतर, घडलं असं की, २१ जूनच्या रात्री एक २४ वर्षीय तरुण त्याच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यावेळी त्याला त्याच्या ओळखीच्या एका मुलीकडून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला.

जेव्हा तो खोलीत पोहोचला तेव्हा...

मेसेजमध्ये असं म्हटलं होतं की, आम्ही दोघी बहिणी आहोत. तसेच, मेसेजमध्ये त्या तरुणाला शिवनगरमधील एका खोलीत बोलावण्यात आलं होतं. तो तरुण त्या मुलीशी आधीच परिचित होता, त्यामुळे त्याला कोणताही संशय आला नाही. तो मुलीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. यानंतर, खोलीत प्रवेश करताच त्याला धक्का बसला. खोलीत मुली किंवा बहिणी नव्हत्या. मुलीचे वडील, तिचा चुलत भाऊ आणि दुसरा तरुण तिथे त्याची वाट पाहत होते.

आरोपींनी तरुणाला ओलीस ठेवून मारहाण केली

त्या तिघांनीही त्या तरुणाला पकडलं. त्यानंतर त्यांनी त्याच्याशी क्रूर वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याला ओलीस ठेवलं आणि मारहाण केली. त्यानंतर त्याला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. एवढंच नाही तर आरोपींनी त्या तरुणाचे कपडे काढून त्याचे नग्न फोटो आणि व्हिडिओ बनवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. यासोबतच आरोपींनी त्याच्याकडून २० लाखांची खंडणी मागितली.

कुटुंबाने पोलिसांना माहिती दिली

त्या तरुणाने आरोपीकडे विनवणी केली आणि सांगितलं की त्याच्याकडे इतके पैसे नाहीत. त्यानंतर आरोपीने पाच लाखांची मागणी केली. तरुणाने कसा तरी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला. पीडितेच्या कुटुंबाने ५० हजार देण्याचं सांगितलं, परंतु आरोपी पाच लाखांवर ठाम होते. अखेर पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी ठिकाण शोधून काढले आणि तरुणाची सुटका केली

२४ जून रोजी पोलिसांनी तरुणाचे ठिकाण शोधून त्याला शिवनगर येथून वाचवलं. परंतु आरोपी पळून गेला होता. त्यानंतर बाडमेर पोलिसांनी पथके तयार केली आणि अखेर त्यांच्या गावातील काका-पुतण्याला अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. सध्या पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साताऱ्यातील पठ्ठ्याने चक्क डोंगर फोडलाय; 67 वर्षांचा हा माऊंटन मॅन कोण?

Untitled May 06, 2026 02:29 am

SRPFच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा घोटाळा? खासगी क्लासच्य़ा संचातले 100 पैकी 85 प्रश्न

पुणे पुन्हा हादरलं! ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न? नागरिक आक्रमक, घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

नसरापूरच्या नराधमाचं क्रौर्य, बालिकेच्या तोंडात मोजा, अंगावर जखमा, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT