Mawa Kheer Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि गोड मावा खीर, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

1 लिटर फुल क्रीम दूध, 100 ग्रॅम मावा (खवा), 4 ते 5 टेबलस्पून साखर, 1/2 टीस्पून वेलची पूड, 8 ते 10 बदाम (चिरलेले), 8 ते 10 काजू (चिरलेले), 1 टेबलस्पून पिस्ते, काही केशर काड्या (ऐच्छिक)

Mawa Kheer Recipe | Saam Tv

दूध आटवून घ्या

जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करा. मध्यम आचेवर सतत ढवळत दूध थोडे आटवून घ्या, त्यामुळे खिरीला छान घट्टपणा येतो.

Mawa Kheer Recipe | google

मावा मिसळा

दूध थोडे आटल्यावर त्यात किसलेला किंवा चुरलेला मावा घाला. गाठी राहणार नाहीत याची काळजी घेत मिश्रण नीट ढवळा.

Mawa Kheer Recipe | Saam Tv

साखर आणि वेलची पूड घाला

मावा पूर्णपणे दुधात मिसळल्यानंतर साखर घाला. साखर विरघळल्यावर वेलची पूड घालून खिरीला सुगंध द्या.

Mawa Kheer Recipe | Saam Tv

सुका मेवा घालून शिजवा

चिरलेले बदाम, काजू आणि पिस्ते खिरीत घाला. आणखी 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.

Mawa Kheer Recipe | Saam Tv

केशरामुळे वाढेल चव

विशेष प्रसंगासाठी खीर बनवत असाल तर थोडे कोमट दुधात भिजवलेले केशर घाला. यामुळे रंग आणि चव दोन्ही अधिक खुलतात.

Mawa Kheer Recipe | Saam Tv

सर्व्ह करा

मावा खीर गरम किंवा थंड अशा दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येते. वरून सुका मेवा सजवून दिल्यास तिची चव आणखी वाढते.

Mawa Kheer Recipe | Saam Tv

Skin Care: जर तुम्हाला ग्लोईंग सॉफ्ट त्वचा पाहिजे? तर संध्याकाळी एक चमचा खा हे पाच सीड्स

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा