Shruti Vilas Kadam
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. यामुळे त्वचेतील दाह कमी होतो आणि त्वचा मऊ, तजेलदार राहण्यास मदत मिळते.
चिया बिया अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असतात. या बिया त्वचेला हायड्रेट ठेवून अकाली वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन ईने परिपूर्ण असलेल्या सूर्यफूल बिया त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. यामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकून राहतो.
झिंक, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असलेल्या भोपळ्याच्या बिया त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतात. तसेच मुरुमांची समस्या कमी होऊ शकते.
तिळामध्ये कॅल्शियम, लोह आणि हेल्दी फॅट्स असतात. हे घटक त्वचेचे पोषण करून त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात.
कलिंगडाच्या बियांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम आणि आवश्यक खनिजे असतात. या बिया त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करतात.
हेम्प बियांमध्ये आवश्यक फॅटी अॅसिड्स आणि प्रथिने असतात. त्वचेचा कोरडेपणा कमी करून तिला नैसर्गिक चमक देण्यासाठी या बिया उपयुक्त ठरतात.