Skin Care: प्रायव्हेट पार्टजवळ सतत खाज अन् फंगल इन्फेक्शनचा त्रास होतोय? डॉक्टरांनी सांगितले ७ घरगुती सोपे उपाय

Shruti Vilas Kadam

हळदीचा वापर

हळदीमध्ये अँटीफंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळद आणि नारळ तेलाची पेस्ट तयार करून प्रभावित भागावर लावल्यास खाज, लालसरपणा आणि सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.

intimate area care | Pintrest

कोरफडी (अ‍ॅलोवेरा जेल) लावा

कोरफडीमध्ये त्वचेला थंडावा देणारे आणि जंतुनाशक गुणधर्म असतात. दिवसातून दोन वेळा अ‍ॅलोवेरा जेल लावल्याने खाज, जळजळ आणि त्वचेची चिडचिड कमी होण्यास मदत मिळू शकते.

intimate area care | Pintrest

लसूण आणि नारळ तेलाचा उपाय

लसूणमध्ये नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म आढळतात. ठेचलेला लसूण नारळ तेलात मिसळून प्रभावित भागावर लावल्यास फंगल संसर्ग कमी होण्यास मदत होऊ शकते.

intimate area care | Pintrest

तो भाग नेहमी कोरडा ठेवा

ओलावा आणि घामामुळे फंगल इन्फेक्शन वाढू शकते. त्यामुळे प्रायव्हेट पार्टजवळील त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

intimate area care | Pintrest

सैल आणि सूती कपड्यांचा वापर करा

घट्ट कपडे टाळून सूती अंतर्वस्त्रे वापरल्यास हवा खेळती राहते आणि संसर्ग वाढण्याचा धोका कमी होतो.

intimate area care | Pintrest

वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका

टॉवेल, अंतर्वस्त्रे किंवा इतर वैयक्तिक वस्तू इतरांसोबत शेअर करू नयेत. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो.

intimate area care | Pintrest

त्रास सुरु राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

खाज, दाद किंवा फंगल इन्फेक्शन वारंवार होत असेल किंवा घरगुती उपायांनी आराम मिळत नसेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

intimate area care | Pintrest

Health Care: रोज रात्री झोपण्याआधी जिरा पाणी प्यायल्याने शरिराला मिळतात हे 7 आरोग्यदायी फायदे

Jeera Pani Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा