Health Care: रोज रात्री झोपण्याआधी जिरा पाणी प्यायल्याने शरिराला मिळतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Shruti Vilas Kadam

पचनक्रिया सुधारण्यास मदत होते

जिऱ्यातील सक्रिय घटक पचनसंस्थेला चालना देतात. रात्री जिरं पाणी पिल्याने अन्नाचे पचन चांगले होऊन गॅस, अपचन आणि पोटफुगीची समस्या कमी होऊ शकते.

Jeera Water Benefits

वजन कमी खाण्यास मदत मिळते

जिरं पाणी चयापचय (Metabolism) सुधारण्यास मदत करू शकते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याच्या प्रयत्नांना हातभार लागू शकतो.

jeera water | goggle

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत

जिरं पाणी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक म्हणून ओळखले जाते. हे शरीरातील काही अपायकारक घटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला मदत करू शकते.

Jeera Water

रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते

काही अभ्यासांनुसार जिऱ्याचे सेवन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास सहाय्यक ठरू शकते. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Jeera Water Benefits | Canva

झोपे चांगली लागते

पचन व्यवस्थित राहिल्यास रात्री अस्वस्थता कमी होते. त्यामुळे शांत आणि आरामदायी झोप मिळण्यास मदत होऊ शकते.

Jeera Water Benefits

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

जिऱ्यात अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि इतर पोषक घटक असतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत मिळू शकते.

Jeera water | Saam tv

जिरं पाणी कसे तयार करावे?

एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं रात्रभर भिजत ठेवा. सकाळी किंवा रात्री ते पाणी गाळून प्या. काहीजण ते हलके कोमट करूनही पितात.

Jeera Water Benefits | Canva

Crispy Dalwada Recipe: घरच्या घरी नाश्त्यासाठी झटपट बनवा खमंग आणि कुरकुरीत डालवडा, वाचा सोपी रेसिपी

Crispy Dalwada Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा