Crime Saam Digital
क्राईम

Pune News : वाघोली अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, डंपरच्या मालकाला ठोकल्या बेड्या

Pune Accident News : वाघोली अपघात प्रकरणी डंपर मालकाला अटक करण्यात आली. पुणे नगर रस्त्यावरील डंपरने कामगारांना चिरडल्याप्रकरणात पोलिसांनी डंपरच्या मालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

Namdeo Kumbhar

दोन दिवसांपूर्वी वाघोली येथे झालेल्या अपघातप्रकरणी पोलिसांनी डंपर मालकाला अटक केली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. दारूच्या नशेत डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. आता डंपर मालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निष्काळजीपणा केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

वाघोली अपघात प्रकरणी डंपर मालकाला अटक करण्यात आली. पुणे नगर रस्त्यावरील डंपरने कामगारांना चिरडल्याप्रकरणात पोलिसांनी डंपर मालकाला अटक केली आहे. निष्काळजीपणा केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनिल काटे असे अटक करण्यात आलेल्या डंपर मालकाचे नाव असून लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यातील वाघोली चौकात भरधाव डंपर चालकाने नशेत फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडले होते, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. डंपर मालकाला चालकाचे दारू पिण्याचे व्यसन होते. जेव्हा डंपर चालक डंपर घेऊन चालला होता तेव्हा काटे याला याबाबत माहिती होती, असे तपासात समोर आले आहे. तपासात काटे याने चालकाने डंपर घेऊन जाताना दारू पिली होती का नव्हती? याबद्दल माहिती नसल्याचेही सांगितले.

पुण्यातील वाघोली अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर

पुण्यातील वाघोली अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मजुरांना चिरडण्यापूर्वी चालकाने एका दुकानावर डंपर घातला होता. वाघोलीतील बायफ रोडवरील ग्राहक सेवा केंद्राच्या दुकानावर डंपर घातला होता. यामध्ये त्या केंद्र चालकाचे संगणक, प्रिंटर व झेरॉक्स मशीनचे व भिंतीचे नुकसान झाले. तेथे धडक देवून व तेथे एका चहा विक्रेत्याशी वाद घालून तो पुढे आला अन् केसनंद फाट्यावर मजुरांना चिरडले. त्या डंपरचा एक आरसा या शटर जवळ आढळून आला आहे.

योगेश मोटकर असे या सेवा केंद्र मालकाचे नाव आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यावर त्याला हा अपघात झाल्याचे समजल्यानंतर त्याने अपघातस्थळी जात डंपरची पाहणी केली. यात त्याच्या शटर व भिंतीचा रंग डंपरला लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT