Pune Crime News: Saam TV
क्राईम

Pune Crime: सासरच्या मंडळींकडून त्रास अन् अपमानास्पद वागणूक, जावयाने आयुष्य संपवलं; पुण्यातील खळबळजनक घटना!

Pune Breaking News: याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे| पुणे, ता. १९ ऑगस्ट २०२४

सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यामधून समोर आली आहे. रियाज मुल्ला असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून पुणे शहरातील वाघोली परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली. शहरातील वाघोली भागात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रियाज मुल्ला असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी त्याच्या आईने सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रियाज याचा सुफी शेखशी विवाह झाला होता. विवाहानंतर किरकोळ कारणावरुन रियाजला त्याच्या सासरकडून अनेक वेळा अपमानास्पद वागणूक देऊन त्याला त्रास देण्यात येत होता. या त्रासामुळे रियाज नैराश्यात होता. नैराश्यातून त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी रियाजचे सासरे मुजीब बाबू शेख, सासू शाहीन, आजे सासरे चाँद मौला शेख, पत्नी सुफी, मेहुणी सना उस्मान शेख, मेहरुन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन याबाबतचा अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

शिक्षकांसाठी सरपंच रस्त्यावर, सरपंच थेट कलेक्टरला नडला

पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल, जाणून घ्या कोणते आहेत पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT