अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे
पुण्यामध्ये एका महिलेला विद्युत वायरचा शॉक लागला. या घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कोंढवा परिसरातून ही घटना समोर आलीय. पुण्यात विद्युत वायरचा शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू झालाय. रस्त्यावर साठलेल्या पाण्यात वायरचा करंट उतरला असल्याची माहिती मिळतेय. या घटनेबाबत आपण सविस्तर जाणून घेवू या.
काय आहे घटना ?
पुण्यातील कोंढवा परिसरात रस्त्यावर पडलेल्या वायरचा शॉक लागल्यामुळे ४० वर्षीय महिलेला जीव गमवावा लागला. पाण्यात पडलेल्या वायरचा अंदाज न आल्याने त्याचा झटका लागताच महिला मृत्युमुखी (Pune News) पडली. या महिलेची ओळख अजून पटलेली नाही. या ४० वर्षीय महिलेचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. या महिलेची ओळख पटविण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळतेय.
पाण्यात वायरचा करंट उतरला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेली महिला कोंढवा परिसरात राहायला होती. काल दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं (woman death due to electric shocked) होतं. दरम्यान ही महिला बाहेर पडली असताना त्या ठिकाणी असलेल्या डीपी मधून विद्युत तारा बाहेर आल्या होत्या. रस्त्यावर साठलेल्या पाण्यात या वायर आल्यामुळे त्या वायर महिलेला दिसल्या नाहीत. महिलेचा स्पर्श होताच विद्युत तारांच्या झटक्यात तिचा जागीच मृत्यू झालाय.
महिलेचा जागीच मृत्यू
घटनेनंतर मोठा जमाव जमला होता. महिलेला तिथून बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू (Pune rain update) होते. परंतु महिलेचा अगोदरच मृत्यू झालेला होता. त्यामुळे तिला वाचवणं शक्य झालं नाही. काल १८ ऑगस्ट रोजी रात्री पुण्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचलं (death due to electric shock) होतं. अंडर पासिंग ब्रिजमध्ये असणाऱ्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं होतं. स्टेशनवर आलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.