Shocking News: हृदयद्रावक! हॉकी खेळताना अचानक वीज कोसळली; ३ खेळाडूंचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

Lightning Strike: हॉकीचा सराव करत असलेल्या खेळाडूंसोबत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
lightning strike
lightning strikecanva
Published On

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. बुधवारी वीज पडून नवोदीत हॉकी खेळाडूंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कमीत कमी ३ खेळाडूंना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर ५ खेळाडू गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनूसार हे खेळाडू हॉकी सामन्यसाठी सराव करत होते. मात्र वीज पडून त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

lightning strike
IND vs BAN: गंभीर-रोहितला डोकेदुखी! केएल राहुल, श्रेयस अय्यर अन् रिषभ पंत यांच्यामुळे या तिघांचा पत्ता कट?

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना झपला आरसी शाळेलगत असलेल्या मैदानावर घडली आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, मृत पावलेल्या खेळाडूंचे शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

केरळमधील वायनाड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे बुधवारी वायनाड जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. IMD कडून ऑरेंज अलर्टही देण्यात आला होता. वायनाडमधील जोरदार पावसामुळे भुस्खलन झाल्याने २३० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वायनाडसह लक्षद्वीपलाही रेड अलर्ट देण्यात आला आहे.

lightning strike
Team India Bowling Coach: ठरलं! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू बनला टीम इंडियाचा बॉलिंग कोच

हवामान विभागाने गुरुवारी वायनाड आमि कोझीकोड येथे जोरदार (२४ तासांत सात सेंटीमीटर ते ११ सेंटीमीटरपर्यंत) ते अतिजोरदार पाऊस (२४ तासांत १२ सें.मी. ते २० सें.मी.) पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यासह लक्षद्वीपला रेड अलर्ट देण्यात आला आहे. यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याची चेतावणी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com