Lightning Strike
Lightning StrikeSaam tv

Lightning Strike : अंगावर वीज पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू; साक्री तालुक्यात दोन ठिकाणी पडली वीज

Dhule News : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस देखील झाला.

धुळे : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. यात आज सकाळच्या सुमारास (Dhule) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडल्याची घटना उघडकीस आली आहे, यात एका घटनेत अंगावर वीज पडून सोळा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे.  (Latest Marathi News)

Lightning Strike
Pune Crime : खरेदी करण्यासाठी आला अन् सोन्याची चैन घेवून झाला फरार; पुण्याच्या वाघोलीतील घटना

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस देखील झाला. काही ठिकाणी तर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या दरम्यान धुळे जिल्ह्यातील (Sakri) साक्री, पिंपळनेर परिसरात देखील पावसाचे आगमन झाले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि या दरम्यान अचानक वीज कडाडली, व विविध दोन ठिकाणी ही वीज (Lightning Strike) दोन ठिकाणी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lightning Strike
Pimpri Chinchwad Crime : चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडूनच खून; पोलिस तपासात सत्य आले समोर, आरोपी ताब्यात

साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात ही घटना घडली असून नांदरखी या गावातील १६ वर्षीय वैभव कुवर या मुलाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या ठिकाणी निंबाच्या झाडावर वीज पडल्याने झाड दोन भागात विभागले गेले असल्याचे दिसून आले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com