Accused 20 Years Jailed In Physical Abused Case saam tv
क्राईम

Pune Crime: जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ७ वर्षानंतर नराधमाला २० वर्ष कारावासाची शिक्षा

Accused 20 Years Jailed In Physical Abused Case: पुण्यातील हडपसर परिसरात २०१८ मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावलीय.

Bharat Jadhav

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी शुक्रवारी (ता. २१) हा निकाल दिला. भीमराव मुकिंदा कांबळे (वय २७, रा. सांडस, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरात २०१८ मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. याबाबत पीडित १४ वर्षीय मुलीने हडपसर पोलिसात फिर्याद दिली होती. या प्रकरणी कांबळे याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी काम पाहिले. आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्यावर खटला चालवण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने ८ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.

कधी घडली होती घटना

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना २०१८ मध्ये घडली होती. याप्रकरणाचा तपास करत पोलिसांनी भिमराव मुकिंदा कांबळे या व्यक्तीला अटक केली. अत्याचार प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं. न्यायालयाने ८ साक्षीदारांचा साक्ष घेतली. त्यानंतर आज ७ वर्षानंतर नराधमाला कारावासाची शिक्षा सुनावलीय.

आरोपी हा पीडितेच्या घराशेजारी असलेल्या पोल्ट्रीमध्ये काम करायचा. घटनेच्या दिवशी नराधम भिमरावने पीडिता एकटी असल्याचा फायदा घेतला आणि अत्याचार केला. पीडिता घरी एकटी होती, त्यादिवशी घरात लाईट नव्हती याचा फायदा घेत अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबदद्ल कोणाला त्याचा वाच्यता केली तर जीवे मारू अशी धमकीही नराधमाने पीडितेला दिली होती. त्याने पीडितेला मारहाण देखील केली होती.

घटनेबाबत कोणाला सांगू नये, यासाठीही तिच्यावर दबाव आणला होता. मात्र पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT