Shocking Crime: मुलाने सावत्र आईला प्रियकरासोबत 'नको त्या' अवस्थेत पाहिलं, दोघांनी मिळून चिमुकल्याला संपवलं; पुढे जे घडलं

Stepmother and lover crime Kills Child: चिमुकल्याने सावत्र आई आणि तिच्या प्रियकराला एकत्र पाहिले. यामुळे दोघांनी मिळून चिमुकल्याचा गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह घरातील एका पेटीत लपवून ठेवले.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

सावत्र आई आणि तिच्या प्रियकराने मिळून सावत्र मुलाची हत्या केली आहे. चिमुकल्याने सावत्र आई आणि तिच्या प्रियकराला एकत्र पाहिले. यामुळे दोघांनी मिळून चिमुकल्याचा गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह घरातील एका पेटीत लपवून ठेवले. ही धक्कादायक घटना हापूर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी हापूर न्यायालयाने पाच वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी सावत्र आई आणि महिलेच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

यासोबतच दोषींना प्रत्येकी २५,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. जिल्हा पोलिस प्रवक्त्यांनी सांगितले की, २० फेब्रुवारी २०२० रोजी बहादुरगड पोलिस स्टेशन हद्दीतील पासवाडा गावात, पाच वर्षीय मारुफने त्याची सावत्र आई शबानाला तिच्या प्रियकर नसीरसोबत घरी आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. 

Crime News
'जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए..', कुणालच्या 'त्या' गाण्यावर शिवसैनिक आक्रमक, तोडला सेट; ११ जण ताब्यात

आपले गुपित उघड होईल या भीतीने शबाना आणि नसीरने मारुफचा गळा दाबून हत्या केली. एवढेच नाही तर मारुफची हत्या केल्यानंतर मृतदेह घरातील एका पेटीत लपवून ठेवलं.

Crime News
Kunal Kamra: भरमसाठ शिव्या, थेट आव्हान; शिवसैनिक आणि कुणाल कामराचा संभाषणाचा ऑडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ

पोलिसांनी या घटनेसंदर्भात सांगितलं की, मृत मुलाचे वडील फकरू यांनी या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तक्रारीच्या आधारी, पोलिसांनी सावत्र आई आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच अटकही केली. १२ मार्च २०२० रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com