Pune Crime Saam TV
क्राईम

Pune Crime: पत्नीच्या नावावर कर्ज काढून मित्राला देणं जिवावर बेतलं; पैसे परत मागताच बांबूने बेदम मारहाण

Pune Crime News: गेल्या काही महिन्यांपासून या कर्जाचे हप्ते थकले होते. काढलेल्या कर्जाचे थकीत हप्ते मागितल्याचा राग आल्याने दोघांनी या व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केलंय.

Ruchika Jadhav

Pune News:

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. सातत्याने पुण्यातून गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात आता पुण्यात थकीत कर्जाचे हप्ते मागितल्यावरून बेदम मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर बँकेतून कर्ज घेऊन दुसऱ्या व्यक्तीला दिलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून या कर्जाचे हप्ते थकले होते. काढलेल्या कर्जाचे थकीत हप्ते मागितल्याचा राग आल्याने दोघांनी या व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केलंय.

ही घटना कोंढवा परिसरात मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिवनेरीनगर परिसरात घडली. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन बाबू ऊर्फ मेहबूब शेख (वय २८), अमीर मुलाणी (वय ३२, दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी बाबू शेख आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी हसन त्यांच्या पत्नीच्या नावे बँकेतून कर्ज काढून बाबू शेख याला दिले होते. मात्र,त्याने कर्जाचे हप्ते भरले नाहीत. विश्वासाने पत्नीच्या नावे कर्ज काढून दिल्यानंतर हप्ते न भरल्याने हे कर्ज हसन यांच्या अंगावर पडलं होतं.

चार महिन्यांचे हप्ते थकल्याने हसन मित्रासमवेत कर्जाच्या हप्त्यांचे पैसे मागण्यासाठी आरोपी शेखच्या दुकानाजवळ गेले होते. आपल्याकडे पैसे मागितल्याचा राग आल्याने बाबू शेखने हसन यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. शेख एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आणि त्याच्या मित्राने हसना यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, दुकानात काम करणारा कामगार अमीर मुलाणीने हसनच्या डोक्यात बांबूने हल्ला केला. यात हसन गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोन्याच्या दागिन्यांचा मोह आवरला नाही आणि दोन अल्पवयीन मुलांनी केला 80 वर्षीय वृध्देचा खुन

Maharashtra Tourism: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, कोल्हापूरातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT