Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर नियम मोडल्यास खिसा होईल रिकामा; वाहनचालकांवर CCTV ची करडी नजर

Mumbai Pune Expressway CCTV Camera : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एकूण ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या १ एप्रिलपासून एक्सप्रेसवेवर ४०० नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरूवात होत आहे.
Mumbai Pune Expressway
Mumbai Pune ExpresswaySaam TV
Published On

mumbai pune expressway to install 400 cctv camera :

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक नागरिक वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवतात. त्यामुळे भीषण अपघात घडतात. अपघातांची ही मालिका रोखण्यासाठी आता पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

Mumbai Pune Expressway
CCTV Footage: कारवाईपासून पळ काढण्यासाठी तरुणांनी वाहतूक पोलिसांना दुचाकीने उडवलं; घटनेचा थरारक VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एकूण ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येत्या १ एप्रिलपासून एक्सप्रेसवेवर ४०० नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरूवात होत आहे. त्यामुळे आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आता दर किलोमीटरला वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांना नियम पाळण्यास भाग पाडण्यासाठी नवे सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

भरधाव वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, रस्त्याच्या कडेला गाडी थांबवणे, वाहने ओव्हरलोड करणे या सर्वांसाठी वाहनचालकांना आता अतिरिक्त दंड द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरून प्रवास करत असाल तर सावधान. कारण एक चूक देखील तुमचा खिसा रिकामा करू शकते.

Mumbai Pune Expressway
Pune Crime News: पुण्यात कॉलेज तरुणीवर सामूहिक अत्याचार; हडपसर परिसरातील संतापजनक घटना, पोलिसांत गुन्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com