CCTV Footage: कारवाईपासून पळ काढण्यासाठी तरुणांनी वाहतूक पोलिसांना दुचाकीने उडवलं; घटनेचा थरारक VIDEO

Ulhasnagar Crime News: पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता सदर चालक न थांबता थेट पोलीस कर्मचारी चंद्रशेखर तळेले यांना जोरदार धडक देत वेगाने निघून गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
CCTV Footage
CCTV FootageSaam TV
Published On

Ulhasnagar:

उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी विश्वात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात शहाड ब्रिजजवळ एका तरुणाने वाहतुकीचे नियम मोडलेत. इतकच नाही तर त्याने थेट वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आहे. घटनेचा संपूर्ण थरार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विरुद्ध दिशेने ड्रायव्हिंग करणारा एक दुचाकीस्वार न थांबता वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना जोरदार धडक देत वेगाने निघून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आरोपीला अटक केली आहे.

२४ जानेवारी रोजी उल्हासनगर वाहतूक उपविभाग नेमणुकीतील पोलीस हवालदार चंद्रशेखर तळेले हे दहा वाजेच्या सुमारास शहाड जकात नाका शिवमंदिरासमोर ड्युटीवर उपस्थित होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने एका दुचाकीवरून दोन तरुण येत होते. तरुणांना थांबवण्यासाठी वाहतूक पोलीस पुढे आले त्यांनी तरुणांना थांबण्यास सांगितले. मात्र तरीही त्यांनी वाहतूकीचे नियम मोडले.

पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता सदर चालक न थांबता गाडी थेट पोलीस कर्मचारी चंमाफ करा, परंतु आपण जो इनपुट दिला आहे तो अपूर्ण आहे. द्र हे केवळ एक अक्षर आहे आणि त्याचे कोणतेही स्पष्ट अर्थ निश्चित करणे शक्य नाही. कृपया पूर्ण वाक्य किंवा संदर्भ प्रदान करा, जेणेकरून मी त्याचे योग्यरित्या मराठीत रूपांतर करू शकेन.शेखर तळेले यांना जोरदार धडक देत वेगाने निघून गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेतील समीर शेख या आरोपीला पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा साहाय्याने अटक केलीये.

उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याचा इंचार्ज सांभाळ्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

त्याचप्रमाणे शहाड फाटक येथे देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने त्यात ही घटना कैद झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com