Crime News Saam tv
क्राईम

Pune Crime News: जेवणात चिकन दिलं नाही म्हणून मुलीच्या डोक्यात वीट मारली; पुण्यातील संतापजनक घटना

Crime News: जेवणात चिकन दिलं नाही म्हणून आपल्या मुलीच्या डोक्यात वीट घातल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरात ही घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Crime News:

जेवणात चिकन दिलं नाही म्हणून आपल्या मुलीच्या डोक्यात वीट घातल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विकास राठोड असं आरोपी पित्याचं नाव आहे. विकास त्याच्या पत्नी आणि मुलीसह पुण्यात राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास सोमवारी रात्री कामावरून घरी आला. त्यानंतर काही वेळातच तो जेवण करण्यासाठी बसला. (Crime)

परंतु जेवणात चिकन (Chicken)असेल अशी त्याला अपेक्षा होती. मात्र जेवणात चिकन नसल्याने चिडून त्यानने आपल्या लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली.

या घटनेनंतर विकास राठोडच्या पत्नीने आपले वडिल रघुनाथ लालु पवार (रा.पाषाणा ) आणि आपल्या नातेवाईकांसह चतु:शृंगी पोलीस स्टेशन गाठलं आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Meta Microsoft Layoff: मोठी बातमी! मायक्रोसॉफ्ट अन् मेटा २३,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार? कंपनी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

Lawrence of Punjab: 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वादाच्या भोवऱ्यात; रिलीजआधीच बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT