Uttar Pradesh News: धक्कादायक! लग्नात रंगला हत्येचा थरार; गरम जेवण न मिळाल्यानं आचाऱ्याच्या अंगावर ओतलं तेलं

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नात आलेल्या एका व्यक्तीला गरम जेवण न मिळाल्यामुळे जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यावर उकळते तेल आतेले आहे.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsSaam Digital
Published On

Groom Uncle Throw Hot Oil On Halwai

उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नात आलेल्या एका व्यक्तीला गरम जेवण न मिळाल्यामुळे जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यावर उकळते तेल आतेले आहे. तेल ओतल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेने लग्नसमारंभात एकच खळबळ माजली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशातील मूसघाण पोलीस ठाण्याच्या परिसरात पन्नालाल यांच्या मुलीचे बुधवार(ता.२९) रोजी लग्न होते. लग्न कार्यादरम्यान पाहुणे मंडळी जेवणासाठी गेले होते. दरम्यान नवऱ्या मुलाचे काका इंद्रपालही जेवणासाठी काही नातेवाईकांसोबत जेवायला गेले.

गरमागरम चपाती न मिळाल्यामुळे काका बनला हैवाण...

त्यावेळी तिथं असलेला आचारी राजेश हा चपाती बनवत होता. त्याने एक चपाती भाजली आणि तिथं उपस्थित असलेल्या पाहुण्यांना दिली. त्यावर ही चपाती तेथील एका काकांना थंड वाटली. त्यामुळे चपाती थंड का आहे असं त्याने आचाऱ्याला विचारलं.... परंतू आरोपी काकांना आचाऱ्याने गरम चपाती देण्यासाठी काही वेळ थांबण्यास सांगितले असता आरोपीला राग आला.

काका आणि आचाऱ्यामध्ये यावरून वाद सुरु झाले. हा वाद इतका विकोला गेला की काकांनी रागात येऊन त्याच्या समोर असलेल्या गरम कढईतले उकळते तेल आचाऱ्याच्या अंगावर फेकले.

या घटनेत पीडित आचारी गंभीररित्या भाजला गेला आहे. या घटनेनंतर राजेशला जवळील रूग्णालयात दाखल केले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास मूसघाण पोलीस करत असून फरार आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसंच आरोपी काकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Uttar Pradesh Crime News
Crime News: जन्मदात्या बापाचे क्रूर कृत्य, पोटच्या मुलीला हत्येनंतर जाळलं; धक्कादायक कारण समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com