Chandrapur Crime Saam tv
क्राईम

Pune Crime: बुरखा घालून घरात शिरले अन् सपासप वार केले, मुलींच्या डोळ्यादेखत वडिलांची हत्या; पुणे हादरलं

Pune Crime News: पुणे शहरामध्ये आणखी एक खूनाचा प्रकार समोर आला असून धारदार शस्त्रांनी वार करत कर्वेनगर परिसरात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. २१ सप्टेंबर

Pune Karvenagar Crime: खून, दरोडे, मारामाऱ्या अन् कोयता गँगची दहशत.. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर सध्या याच गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपासून पुणे शहरात हत्यांचे सत्र सुरु आहे. नुकत्याच झालेल्या गणपती विसर्जनादिवशी शहरात दोन हत्यांच्या घटना घडल्या होत्या. अशातच आता पुणे शहरामध्ये आणखी एक खूनाचा प्रकार समोर आला असून धारदार शस्त्रांनी वार करत कर्वेनगर परिसरात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील कर्वेनगर येथे उच्चभ्रू श्रीमान सोसायटीमध्ये एका इसमाचा रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने वार करुन खून करण्यात आला आहे. राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय, 42) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुरखा घालून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी राहुल निवंगुने यांच्यावर हल्ला चढवला, या हल्ल्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास राहुल पंढरीनाथ निवगुंने यांच्या घराचा दरवाजा अज्ञात इसमांनी वाजविला. इतक्या रात्री कोण आले असे म्हणून राहुल याने दरवाजा उघडला असता आरोपीने त्यांचावर थेट धारदार शस्त्राने सपासप वार केले. यावेळी राहुल यांनी आरडाओरडा केल्या नंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या होत्या पण आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम,किंमती वस्तुची लूट करुन पसार झाले आहे.

दरम्यान, राहुल हे एका खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करत असुन त्यांना तीन मुली,पत्नी आहे. आरोपींनी तोंडावर बुरखा असल्याने मुलींनी आरोपीनां पाहूनही ओळखता आले नाही. डोळ्यासमोरच वडिलांची हत्या झाल्याने घडलेला प्रकार भयानक असल्याने त्यांचा मुलीचा मनावर मोठा आघात झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT