pregnancy test racket busted police arrests fake doctor from hasnabad near sambhajinagar Saam Digital
क्राईम

12 वी शिकला अन् दवाखाना थाटला, गर्भपात प्रकरणात हसनाबादमधील बाेगस डाॅक्टरला अटक

sambhajinagar crime news: अवैध गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणी एकूण 19 आरोपी निष्पन्न झाले असन आत्तापर्यंत 15 संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडणाऱ्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी शेकडो कळ्या गर्भातच खुडणाऱ्या रॅकेटमधील आणखी एका बोगस डॉक्टरचा पोलिसांनी भांडाफोड केला. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील इरफान हनीफ शेख या बोगस डॉक्टरला आणि पत्नीची गर्भलिंग निदान तपासणी करणा-या एकाला पाेलिसांनी अटक केली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार इरफान हा हसनाबाद मध्ये डॉक्टर असलेल्या वडिलांचा दवाखाना स्वतः चालवत होता. ताे 12 पर्यंतच शिकला आहे. त्याचा 8 वर्षापासून हा गोरख धंदा सुरू होता. त्याशिवाय ऍलोपॅथी गोळ्यांसह त्याच्या दवाखान्यात अनेकदा गंडेदोर्याचेही प्रयोग झाल्याची माहिती आता तपासात समोर आल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

धक्कादायक म्हणजे आठवडी बाजार असल्याने इरफानकडेही रुग्णांची गर्दी जास्त होती. त्यामुळे पोलिस देखील बनावट रुग्ण बनून गेले. तेव्हा इरफान रुग्णांचीच तपासणी करत असल्याचं उघडकीस आलं आणि तेव्हाच हे सगळं बिंग फुटलं. दरम्यान येणाऱ्या गर्भवती महिलांना तो लिंगनिदान करून देण्याचे सांगून गर्भपात करण्याची देखील जबाबदारी घेत असे तपासात निष्पन्न झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Bhavan : मोठी बातमी! विधानभवानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Scalp Massage Tips: आठवड्यातून दोन वेळा करा 'स्काल्प मसाज', केसांची होईल भरभर वाढ

Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT