bhandara police charged 7 along with sand and tractors worth rs 36 lakh 56 thousand  saam tv
क्राईम

Bhandara Crime News : भंडारा जिल्ह्यात अवैधरित्या रेती वाहतूक करणारे 7 ट्रक्टरसह 35 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

तुमसर तालुक्यात होत असलेल्या रेतीच्या अवैध उपशाला आळा बसावा यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरु आहे. सकाळच्या सुमारास पोलिसांनी माेठी कारवाई केली.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara :

भंडारा जिल्ह्यात आयपीएस रशमिता राव यांनी धडक कारवाई करीत रेती वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर पकडले. या कारवाईत ३५ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाेलिसांनी ट्रॅक्टर चालक, मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुमसर तालुक्यात होत असलेल्या रेतीच्या अवैध उपशाला आळा बसावा यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरु आहे. सकाळच्या सुमारास पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना रेती वाहतुकीचे ट्रक्टर थांबवले. या ट्रक्टर चालकांकडे पाेलिसांनी चाैकशी केली असता त्यांची भांबेरी उडाली.

पाेलिसांनी नवरगाव ते तामसवाडी मार्गावर वाहनांची तपासणी केली. विना परवाना वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर, एकूण ७ ब्रास रेती, ६ मोबाइल जप्त केले. पाेलिसांनी या कारवाईत एकूण ३५ लाख ५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT