dhule police arrests hiraman baisane for hittng wife Saam Digital
क्राईम

Dhule Crime News : धुळे हादरलं! रस्त्यावरच पतीने गळा चिरून पत्नीला संपवलं

Dhule Latest Marathi News : पतीने एवढ्या टोकाची भूमिका का घेतली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तरी तपास यंत्रणांच्या माध्यमातून पश्चिम देवपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

भूषण अहिरे

Dhule :

कौटुंबिक वादातून पत्नीची भर दिवसा गळा चिरून पतीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील देवपूर परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाेलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार हिरामण बैसाणे याने भर रस्त्यात दुपारच्या वेळी धारदार शास्त्राने पत्नी अनिता बैसाणे (वय 40) हिची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर ताे घटनास्थळावरुन पसार झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी तपास यंत्रणांसह दाखल झाले. पाेलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान पतीने एवढ्या टोकाची भूमिका का घेतली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तरी तपास यंत्रणांच्या माध्यमातून पश्चिम देवपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update : पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT