Crime News Yandex
क्राईम

Crime News: विकृतीचा कळस! मालाडमध्ये १० वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Physically Abused Minor Boy: मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी दोन व्यक्तींना अटक केली आहे.

Rohini Gudaghe

सुरज सावंत

Malad Mumbai Crime News

मुंबईमध्ये (Mumbai) दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. नेहमीच खून, दरोडा, चोरी, अत्याचाराच्या घटना घडत असतात. दिवसेंदिवस या घटनांमध्ये भर पडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता मुंबईतील मालाडमधून (Malad) समोर येत आहे. नक्की ही घटना काय आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.  (Latest Crime News)

दोन व्यक्तींनी एका १० वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मालाडमधून समोर आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार (Physically Abused Minor Boy) करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निर्जनस्थळी अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

१० वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे समोर आली आहेत. कन्ना परीमल आणि तंबा परीमल अशी या दोन आरोपींची नावे (Physically Abused 10 year Old Boy) आहेत. हा १० वर्षीय अल्पवयीन मुलगा घराच्या अंगणात खेळत होता. तेव्हा आरोपी कन्ना त्याला गोड बोलून त्याच्या कुटुंबीयांच्या नकळत घराजवळील निर्जनस्थळी घेऊन गेला होता.

कन्ना परीमल आणि तंबा परीमल या दोघांनी या मुलाला निर्जनस्थळी नेल्यावर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार (Crime News) केले. त्यानंतर आरोपी कन्ना याने मुलासोबत अनैसर्गिक अत्याचार करत याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. हा लहान मुलगा झालेल्या प्रकाराने घाबरून गेला होता.

आरोपींनी दिली जीवे मारण्याची धमकी

मात्र, घरी परतल्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती मुलाने घरातल्यांना कुटुंबीयांना दिली. त्यानंतर हे प्रकरण पुढे आले. पीडित मुलाचे कुटुंबीय आरोपींना जाब विचारण्यासाठी (Mumbai Crime News) गेले. तेव्हा पीडित मुलाच्या कुटुंबियांना कन्नाचा भाऊ तंबा याने पोलिसांत गेल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

परंतु पीडित मुलाच्या कुटुंबियांनी मालाड पोलिसांत (Police) तक्रार दिली. या दिलेल्या तक्रारीनुसार मालाड पोलिसांनी ३७७,५०६ (२), ३८ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींना अटक केली आहे. आता पुढील तपास मालाड पोलीस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT