Pimpari Chinchwad Prostitution Raket Saamtv
क्राईम

Pimpari Chinchwad Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांना माहिती मिळाली अन्....

Pimpari Chinchwad Latest News: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आला आहे.

गोपाल मोटघरे

Pimpari Chinchwad Crime:

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पिंपळे निलख परिसरातील एका स्पा सेंटरवर धाड टाकून देहविक्री करणाऱ्या तीन मुलींची सुटका केली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, काहीजण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत आहेत.. अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कशाला मिळाली, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळे निलख परिसरातील ब्रह्मानंद कॉलनी इंगवले नगर येथिल फ्लॅट नंबर 201 येथे जे पी फॅमिली स्पा सेंटरवर धाड टाकली.

या धाडीमध्ये पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये देहविक्री करणाऱ्या तीन मुलींची सुटका केली आहे. तसेच या प्रकरणात स्पा चालक जया अशोक जाधव आणि निखिल मोहन नवघन या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींविरोधात सांगवी पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 370, 34, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम तीन, चार, पाच आणि सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpari Chinchwad News)

केळीच्या बागेत गांजाची लागवड..

नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदुरबारच्या नवानगर (ता.शहादा) येथे केळीच्या शेतात गांजाची लागवड केल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन १७ लाख ७४ हजार रुपये किमतीचा २ क्विंटल ५३ किलो गांजा जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT