Kalyan Crime: घराचे आमिष दाखवून ६७ लाखांची फसवणूक; बिल्डरला ४ वर्षांची शिक्षा

Kalyan Latest News: जवळपास ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता
Kalyan Crime News
Kalyan Crime News Saam Digital
Published On

अभिजित देशमुख, प्रतिनिधी

Kalyan Crime News:

कल्याणमध्ये घर आणि दुकानाचे गाळे देतो असे सांगून लोकांना लाखोंचा गंडा घालणारा बिल्डर सुनील पोटे याला ठाणे न्यायालयाने साडेचार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर १५ लाख रुपयांचाही दंड ठोठावला आहे. या प्रकरणी गेल्या १९ महिन्यांपासून तो न्यायालयीन कोठडीत होता.

बिल्डर सुनील पोटे याने कल्याणमधील (Kalyan) रहिवासी पूरण रामकृपाल मौर्या यांना एक घर आणि दुकानाचा गाळा देतो असे सांगितले होते. त्या बदल्यात मौर्या यांनी पोटे याला १५ लाख रुपये दिले होते. मात्र त्यांना दुकान आणि घर काही मिळाले नाही. फसवणूक झाल्यामुळे मौर्या पोटे यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. मौर्या यांच्याप्रमाणेच पोटे यांनी अन्य सात जणांची अशी फसवणूक करीत त्यांच्याकडून पैसे उकळले होते.

या सगळ्यांची जवळपास ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करण्यात आल्यावर त्याची रवानगी न्यायालयीन काेठडीत करण्यात आली. गेल्या १९ महिन्यापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याने तक्रारदारांचे पैसेही देण्याची तयारी दाखविली होती. या आधारे त्याला जामीन मंजूर करण्यात यावा असे न्यायालयास त्याने सांगितले होते.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime News
Kunbi certificate: मराठवाड्यापाठोपाठ राज्यभरात कुणबींच्या नोंदी शोधा; मुख्यमंत्री शिंदेंचे अधिकाऱ्यांना आदेश

मात्र त्याच्या या जामीन अर्जास तक्रारदार मौर्या यांचे वकिल महेश शिवदास यांनी हरकत घेतली होती. हे प्रकरण कल्याण न्यायालयातून ठाणे न्यायालयाकडे पाठविले गेले. या प्रकरणी काल ठाणे न्यायालयातील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी पोटे याला साडे चार वर्षाची शिक्षा आणि १५ लाखाचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, यापूर्वीही पोटे यांच्या विरोधात महात्मा फुले, पनवेल आणि मुंबईत फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याने त्या गुन्ह्यात अनेकांची काेट्यावधी रुपयाची फसवणूक केली आहे. तसेच त्याने अनेकांना दिलेले धनादेश वटलेले नाहीत. या प्रकरणीही गुन्हे दाखल आहेत. या पूर्वीच्या प्रकरणात तो फरार हाेता. यापूर्वीही त्याला शिक्षा लागलेली आहे. (Latest Marathi News)

Kalyan Crime News
Maratha Reservation : एक-एक मिनिट महत्वाचा!; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत CM शिंदेंनी नेमक्या कोणत्या सूचना केल्या?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com