ISRO: इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांच्या आत्मचरित्राचा काय आहे वाद; पुस्तक मागे का घेतलं?

ISRO Chief S Somnath: इस्रोचे प्रमुख एस. अध्यक्ष सोमनाथ यांच्या आत्मचरित्रावरुन वाद झाल्यानंतर सोमनाथ यांनी मोठा निर्णय घेतलाय.
ISRO: इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांच्या आत्मचरित्राचा काय आहे वाद; पुस्तक मागे का घेतलं?
Published On

ISRO Chief S Somnath Autobiography :

इस्रोचे प्रमुख एस.अध्यक्ष सोमनाथ यांच्या आत्मचरित्रावरुन वाद झाल्यानंतर सोमनाथ यांनी मोठा निर्णय घेतलाय. सोमनाथ यांनी आपल्या पुस्तकात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख के. सिवन यांच्याविषयी खळबळ दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याने सोमनाथ यांनी आपलं आत्मचरित्र प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतलाय. (Latest News)

द इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार सोमनाथ यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. मी माझ्या आत्मचरित्रात कोणावर जाणूनबुजून आरोप केले नाहीत. कोणावर निशाणा साधला नव्हता, असं सोमनाथ यांनी या वृत्ताचा दुजोरा देताना सांगितलं. त्यांच्या मते त्यांचे आत्मचरित्र हे लोकांना प्रोत्साहन देते आणि मार्ग दाखवणारं आहे. परंतु कोणाल दु:खी करण्याचा त्यांचा विचार नव्हता, असं सोमनाथ म्हणालेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एस. सोमनाथ यांनी आपलं आत्मचरित्र निलावू कुदिचा सिम्हंगल (द लायन्स दॅट ड्रंक द मून) मध्ये चंद्रयान-२ मोहीम का अपयशी झाली याचेही कारण सांगितलं होतं. यासह त्यांनी इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन यांच्यावर आरोप केले होते. चंद्रयान-२ मोहीमेसाठी वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये खराबी असल्याचं सोमनाथ यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं होतं. मोहीमेसाठी पुरेशा चाचण्या घेण्यात आल्या नव्हत्या.

ही मोहीम घाईत करण्यात आली होती. चंद्रयानमध्ये वापरण्यात आलेले सॉफ्टवेअरमध्ये खराबी होती. परंतु त्यावेळी इस्रोचे प्रमुख असलेल्या सिवन यांनी सांगितलं होतं की, लॅडरसोबत संपर्क झाला नव्हता. तसेच सिवन यांना सोमनाथ हे इस्रोचे प्रमुख म्हणून नको होते, असा खळबळजनक दावा सोमनाथ यांच्या आत्मचरित्रात करण्यात आला होता.

के.सिवन हे इस्रोचे प्रमुख झाल्यानंतर त्यांनी विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (वीएसएससी ) च्या निदेशक म्हणून सोमनाथ यांची पदोन्नती जाणूनबुजून उशिराने केली होती, असाही आरोप सोमनाथ यांनी आपल्या पुस्तकात केला होता.

ISRO: इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांच्या आत्मचरित्राचा काय आहे वाद; पुस्तक मागे का घेतलं?
ISRO, Space Station, Moon Mission: २०३५ पर्यंत अंतराळ स्टेशन...२०४० मध्ये चंद्रावर जाणार पहिला भारतीय, पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com