Crime New Saam Tv
क्राईम

Patna Crime News: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय; अख्ख्या कुटुंबावर माथेफिरू पतीचा हल्ला, २ मेहुण्यांचा मृत्यू

Crime News: बिहारमधील लखीसरायमध्ये धक्कादायक घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

illicit relationship crime news :

बिहारमधील लखीसरायमध्ये धक्कादायक घटना घडली. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयाचं भूत मानगुटीवर बसलेल्या २७ वर्षीय तरुणाने तिच्या अख्ख्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. दोन मेहुण्यांची गोळ्या झाडून हत्या केली. तर पत्नीसह इतर चार जखमी झाले आहेत.

आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. पाच वर्षांपूर्वी त्यानं दुर्गासोबत प्रेमविवाह केला होता. तिचं कुटुंब सोमवारी छटपूजा घाटावरून घरी परतत असताना आरोपीने हे भयंकर कृत्य केले.

पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. आरोपीच्या चार साथीदारांना ताब्यात घेतले आहे. आशिष फरार झाला आहे. पत्नी दुर्गाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्याला होता. त्याच रागातून आशिषने हा गुन्हा केल्याचे सांगितले जात आहे.

पाच वर्षांपूर्वी आरोपीने दुर्गासोबत पळून जाऊन लग्न केले होते. एका वर्षापूर्वी दुर्गा तिच्या आईवडिलांकडे गेली. त्यानंतर ती त्यांच्यासोबतच राहत होती. दुर्गाने त्याच्याकडे राहायला परत यावे, असे आशिषला वाटत होते. मात्र, तिच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते.

दहा दिवसांपूर्वी आशिषचा त्याच्या सासरच्या मंडळींसोबत वाद झाला होता. त्यामुळेच त्याने हा हल्ला केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंदन झा (वय ३१), राजनंदन झा (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. तर पत्नी, तिची बहीण, वडील गंभीर जखमी असून, त्यांना पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुर्गा झा (वय २४), वडील शशी भूषण झा (वय ६०) मेहुणी लवली देवी (३८), प्रिती देवी अशी जखमींची नावे आहेत. हे कुटुंब पंजाबी कॉलनीतील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहत होते. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. आरोपी फरार असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे मुंगेरचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय कुमार यांनी सांगितले.

चिठ्ठीतून उलगडले भंयकर कृत्यामागचे कारण

ही घटना कावैया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संशयित आरोपीने या कृत्यानंतर घटनास्थळी एक चिठ्ठी ठेवली होती. ज्यात दुर्गाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्याने केला होता. त्यामुळेच दुर्गाला त्याच्यासोबत राहायचे नव्हते, असेही नमूद केले होते. या गुन्ह्यात वापरलेले शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे, असे लखीसरायचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

White Hair Care: कमी वयातच केस पांढरे होऊ लागले? मग करा 'हा' घरगुती उपाय, महिन्याभरात दिसेल फरक

Maharashtra Politics : ठाकरेंना काँग्रेस नकोय की काँग्रेसलाच स्वबळावर लढायचंय? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

Thursday Horoscope: पैशाचं नियोजन करा अन्यथा...या राशींच्या व्यक्तींना बसणार आर्थिक फटका, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT