- तबरेज शेख
नाशिक जिल्ह्यात सराईत चाेरटे चेन स्नॅचिंग करत असल्याचे आतापर्यंत आपण पाहिले आहे. पण आता नाशिक शहरात चक्क एका पाेलीस शिपायाने अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील साेन्याची चेन पळवल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दाेनने संशयित पाेलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. (Maharashtra News)
या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार १२ नाेव्हेंबर २०२३ राेजी त्र्यंबक राेडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानामागील रस्त्याने एक महिला पायी जात हाेती. त्याचवेळी याेगेश लाेंढे हा पाेलीस कर्मचारी त्याच्या 17 वर्षीय मित्रासह मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरुन तेथे आला. यानंतर त्याने या महिलेच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. त्यानंतर महिलेने आरडाओरड केला.
काही दिसवाने लाेंढे व त्याच्या अल्पवयीन मित्र नशेत असताना मतभेद झाले. हे वाद पराकाेटीला पाेहाेचत असताना अल्पवयीन मुलाने पाेलिसांना घटनेची माहिती कळवून प्रकार सांगितला.
यानंतर सरकारवाडा पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर व पथक घटनास्थळी पाेहाेचले. त्यांनी या मुलाकडून माहिती घेतली असतानाच शहर गुन्हे शाखेच्या युनिट दाेनचे वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलावडे यांना संशयिताची माहिती समजली.
त्यांच्या सूचनेने पथकाने संशयित लाेंढे यास काही वेळातच ताब्यात घेतले. चाैकशी केली असता ताे पाेलिस शिपाई असल्याचे समाेर आले. दरम्यान, सरकारवाडा पाेलिसांत चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लाच प्रकरणी याेगेश लाेंढेस झाली हाेती अटक
याेगेश लाेंढे हा सध्या गंगापूर राेडवरील शहर पाेलिस मुख्यालयात नियुक्तीस आहे. नाेव्हेंबर २०१८ मध्ये मुंबई नाका पाेलिस ठाण्यात कार्यरत असताना त्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली हाेती. त्यानंतर त्याला पाेलिस आयुक्तालयाने निलंबित केले हाेते. निलंबन काळ संपल्यावर ताे सध्या जनरल ड्युटी करत हाेता.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.