Pastor Bajinder Singh  x (twitter)
क्राईम

Bajinder Singh : महिलेवर बलात्कार प्रकरणात 'येसू येसू फेम पाद्री बजिंदर सिंग' दोषी; कोर्टाचा निर्णय, 'या' दिवशी शिक्षा सुनावणार

Pastor Bajinder Singh News : येसू..येसू.. गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या पाद्री बजिंदर सिंगच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. एका महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी बजिंदर सिंगला दोषी ठरवण्यात आले आहे.

Yash Shirke

Pastor Bajinder Singh : 'येसू.. येसू..' फेम पाद्री बजिंदर सिंगला लैंगिक छळ प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. मोहाली कोर्टाने बजिंदर सिंगला २०१८ च्या लैंगिक अत्याचार प्रकारणात दोषी ठरवले आहे. या प्रकरणी त्याच्या शिक्षेची घोषणा १ एप्रिल २०२५ रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

बजिंदर सिंगवर २०१८ मध्ये एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीडित महिला मोहालीमध्ये राहत होती. 'राहत्या घरामध्ये पाद्री बजिंदर सिंगने माझ्यावर बलात्कार केला', अशी माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली होती. ही घटना रेकॉर्ड करुन तो मला ब्लॅकमेल करत असल्याचेही पीडितेने म्हटले.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१८ मध्ये पीडितेने पोलीस ठाण्यामध्ये पाद्रीच्या विरोधात लैंगिक छळ प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणानंतर पाद्री बजिंदर सिंग फरार झाला. त्यानंतर दिल्ली विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. तो दिल्लीहून लंडनला पळून जाण्याची तयारी करत होता.

काही दिवसांपूर्वी बजिंदर सिंगवर जालंधरमधील एका २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. याशिवाय पाद्री सिंगचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यात तो ऑफिसमधील एका महिला आणि अन्य कर्मचाऱ्यांना मारहाण करत असल्याचे दिसत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone battery life: मोबाइलची बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगला लावावी?

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांच्या खर्चात २० टक्के कपातीचे निर्देश

Curry Leaves Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचे पाणी; होतील 'हे' भन्नाट फायदे

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT