Crime news  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime News: अमली पदार्थांसाठी पोटच्या मुलांना विकलं; मुंबईमधील संतापजनक घटना

Parents Sold Children: अमली पदार्थांचे सेवन करता यावे यासाठी एका दाम्पत्याने संतापजनक कृत्य केलं आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या पती पत्नीने आपल्या पोटच्या मुलांना विकलंय.

Ruchika Jadhav

Mumbai:

अमली पदार्थांच्या सवयीमुळे माणूस स्वत:वरचं नियंत्रण पूर्णत: गमावून बसतो. मुंबईत (Mumbai) अमली पदार्थांचे सेवन करतायावे यासाठी एका दाम्पत्याने संतापजनक कृत्य केलं आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या पती पत्नीने आपल्या पोटच्या मुलांना (Children) विकलंय. पोलिसांच्या सतर्कतेने ही धक्कादायक घटना उडकीस आलीये.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शब्बीर आणि सानिया खान अशी या पती पत्नीची नावे आहेत. अमली पदार्थ खरेदीसाठी या दोघांनी पोटच्या मुलाला ६० हजारांना आणि मुलीला १४ हजार रुपयांना विकलंय. गुन्हे शाखेने आपल्या तपासात नवजात मुलीला ताब्यात घेतलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबिना खान या महिलेला पती पत्नीच्या कृत्यावर संशय आला होता. त्यामुळे तिने डी एन नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. शब्बीर हा रुबिनाचा भाऊ आहे. शब्बीर आणि सानिया लग्नानंतर अमली पदार्थांच्या आहारी गेले होते. त्यामुळे दोघांमध्ये सतत भांडणे व्हायची. काही दिवसांनी सानिया घर सोडून तिच्या माहेरी निघून गेली होती. साल २०१९ मध्ये या दोघांना सुभान नावाचा मुलगा झाला. त्यानंतर दोघेही नालासोपारा येथे निघून गेले.

पुढे साल २०२१ मध्ये त्यांना हुसेन नावाचा मुलगा झाला. तसेच १ ऑक्टोबर रोजी त्यांनी एका मुलीला जन्म दिला. काही दिवसांनी त्यांना पैशांची अडचण निर्माण झाली त्यामुळे ते रुबिनाच्या घरी गेले. यावेळी त्यांच्याबरोबर एकच मुलगा होता. अन्य दोन मुलं कुठे आहेत असं रुबिनाने त्यांना विचारलं त्यावेळी दोघांनीही उत्तरे देण्यास नकार दिला. शेवटी रुबिनाने सानियाला विश्वासात घेतलं तेव्हा तिने आणि तिच्या पतीने केलेल्या कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी सापळा रचून अन्य एका महिलेला देखील ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT