Mumbai News: मुंबई पोलिसांची चमकदार कामगिरी! 410.53 कोटी रुपयांचे 844 किलो अमली पदार्थ केले जप्त; 1,546 जणांना केली अटक

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांची चमकदार कामगिरी! 410.53 कोटी रुपयांचे 844 किलो अमली पदार्थ केले जप्त; 1,546 जणांना केली अटक
Mumbai Police News
Mumbai Police Newssaam tv
Published On

Mumbai Crime News :

मुंबई पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मुंबई पोलिसांनी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 844 किलोग्राम अमली पदार्थ जात केले आहेत. तसेच अमली पदार्थ बाळगण्याच्या 1,260 प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 1,546 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत 410.53 कोटी रुपये आहे.

मिळालेल्या आकडेवारीवरून असे समोर आले आहे की, शहरात गांजा हा सर्वाधिक जप्त करण्यात आला आहे. या वर्षात या कालावधीत 593 किलोग्राम गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Police News
Mumbai Airport Terminal 2 : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, 1 मिलियन डॉलर्सची केली मागणी

पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत, पोलिसांनी हेरॉईन जप्त करण्यासंबंधी 32 गुन्हे दाखल केले आहेत. ज्यात 37 जणांना अटक केली आहे आणि 4.21 कोटी रुपयांचे दोन किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी चरस जप्त करण्यासंदर्भात 34 गुन्हे दाखल केले आहेत.  (Latest Marathi News)

याप्रकरणी 55 जणांना अटक केली आहे आणि 7.54 कोटी रुपयांची 30.6 किलो चरस जप्त केली आहे. पोलिसांनी गांजा जप्त करण्यासंबंधी 752 गुन्हे दाखल केले आहेत, यात 811 जणांना अटक केली आहे आणि 2.44 कोटी रुपयांचा 593.3 किलोग्राम गांजा जप्त केला आहे.

Mumbai Police News
Marathi Business Ideas : सुरु करा 'हा' व्यवसाय, दरमहा कमावू शकता 75,000 रुपये; सरकारही करत आहे मदत

पोलिसांनी कोकेन जप्तीशी संबंधित सात गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी 12 जणांना अटक केली आहे आणि 51.86 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. पोलिसांनी मेफेड्रोन किंवा एमडी जप्त करण्यासंबंधी 362 गुन्हे दाखल केले आहेत, 521 जणांना अटक केली आहे आणि 384.92 कोटी रुपयांचे 201.6 किलोग्राम एमडी जप्त केले आहे. पोलिसांनी प्रतिबंधित कफ सिरपशी संबंधित 51 गुन्हे देखील नोंदवले आहेत. यात 79 जणांना अटक केली आहे आणि 84.70 लाख रुपये किमतीचे 1576.3 लिटर कफ सिरप जप्त केले आहे.

एमडी हे मुंबईतील सर्वात जास्त सेवन केले जाणारे ड्रग्ज आहे, असे मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने दिलेली आकडेवारी सांगते. सेलने या वर्षी 133 जणांविरुद्ध एमडीचाचे सेवन आणि विक्री केल्याप्रकरणी 62 गुन्हे दाखल केले आहेत. अटक केलेल्यांकडून 282.984 कोटी रुपयांचे 14 किलोग्रॅम एमडी जप्त करण्यात यश आले आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एमडीचे अधिक सेवन त्याच्या जलद परिणामुळे केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com